रेल्वे प्रशासनाने पुण्याहून आणखी चार वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पुण्यापासून दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत असून ही संख्या आता सहा होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवासाला अधिक गती मिळणार असून पुणेकरांचा प्रवास आणखी जलद आणि सोपा होणार आहे. सद्यस्थितीत पुण्यातून दोन वंदे भारत एक्सप्रेस कार्यरत आहेत.
(हेही वाचा – Baba Siddique Murder : लवकरच २६ आरोपींविरुद्ध दाखल होणार आरोपपत्र)
या गाड्या पुणे-हुबळी, पुणे-कोल्हापूर आणि मुंबई-सोलापूर व्हाया पुणे या मार्गांवरून धावतात. आता नव्या अतिरिक्त वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) गाड्यांमुळे इतर ठिकाणी जातानाही प्रवासाचा वेळेची वाचणार आहे. याचा पुणेकरांना फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन चार वंदे भारत एक्सप्रेस पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बेळगाव या चार मार्गांवर धावणार आहेत.
(हेही वाचा – Sambhal मध्ये जामा मशिदीसमोर वैदिक मंत्रोच्चाराने झाले पोलीस चौकीचे भूमिपूजन)
या एक्सप्रेस ट्रेन लवकरच सुरु होतील, अशी माहिती आहे. प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं आहे.पुणे-कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे (Vande Bharat Express) तिकीट ५६० रुपये आहे. तर विशेष कोचची तिकीट १,१३५ रुपये आहे. ही एक्सप्रेस बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे तीन दिवशी धावते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community