जे.जे. रुग्णालयात परिचारिकांना शिक्षण देणारी परिचारिका शिक्षण या स्वतंत्र संस्थेचा ताबा जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता म्हणजेच डीन यांना देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला असून या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. नर्सिंग क्षेत्रातील सर्व संघटनांनी यास विरोध दर्शवला आहे. शासनाने हा निर्णय रद्द केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
( हेही वाचा : रविवारी घराबाहेर पडताय? ‘या’ कालावधीत मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक!)
संस्थेच्या सर्व प्राध्यापकांमध्ये खळबळ
मुंबईत परिचारिका शिक्षण संस्था म्हणजेच ऐतिहासिक अमूल्य ठेवा तसेच भारतातील प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य शिखर संस्था, १९६० मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेतून हजारो परिचारिका प्रशिक्षित होऊन आज देशभरात कार्यरत आहेत. हजारो परिचारिकांना पदवी, पदव्युत्तर उच्च शिक्षण देणारी एकमेव संस्था महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात विलीन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. यामुळे संस्थेच्या सर्व प्राध्यापकांमध्ये खळबळ उडाली. सर्वच नर्सिंग संघटनांनी या निर्णयाविरोधात सह्यांची मोहीम सुरू केली असून यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले जाणार आहे.
दरम्यान राज्यात एकूण सहा परिचर्या शिक्षण संस्था असून, त्यापैकी पाच संस्थांवर अधिष्ठात्यांचे नियंत्रण आहे. मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील ही एकमेव संस्था स्वतंत्रपणे काम करत होती. परंतु आता या संस्थेचा ताबा अधिष्ठात्यांकडे देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे.
Join Our WhatsApp Communityसर्व निर्णय स्वतः घेणाऱ्या आणि गेल्या 60 वर्षांपासून स्वतः यशस्वी कारकीर्द पाहणाऱ्या या संस्थेला केवळ प्रशासकीय कारण दाखवत वैद्यकीय विभागात विलीन करण्यात आले आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. तरी शासनाने यावर पुन्हा विचार करून सदर निर्णय मागे घ्यावा. आम्हा सर्व शिक्षकांची अशी मागणी आहे की, सर्व नर्सिंग कॉलेजेस प्राचार्यांच्या अखत्यारित द्यावीत, जेणेकरून आम्हाला कॉलिटी एज्युकेशन देता येईल व नर्सिंग प्रोफेशनचा दर्जा उंचावण्यास हातभार लागेल एक शिक्षक म्हणून मी आज आपल्याला विनंती करत आहे. राज्यातील विविध संघटनांनी या निर्णयाला विरोध देणारे पत्र आमच्याकडे पाठवले आहे.
हेमलता गजबे, राज्य उपाध्यक्ष, परिचारिका संघटना