बाळासाहेबांच्या कलानगरची ओळख अशी घडणार परदेशात

114

वांद्रे पूर्व येथील कलानगरची ओळख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानामुळे निर्माण झालेली असली तरी या कलानगरची ओळख जागतिक स्तरावर पोहोचण्याचा अनोखा प्रयत्न यापूर्वीचे उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. उपनगराचे पालकमंत्री असताना ठाकरे यांनी कलानगरमध्ये सिस्टर सिटी स्क्वेअर उभारण्याचा निर्णय घेतला असून याची उभारणी आता केली जात आहे. त्यामुळे कलानगर येथील परिसरात हिरवळ उभारुन तिथे परदेशातील विविध राष्ट्रांचे झेंडे उभारुन जगाचा ग्लोब लावला जाणार आहे.

( हेही वाचा : स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला वंचितने करायला लावला युतीचा विचार)

वांद्रे पूर्व येथील कलानगर येथे सिस्टर सिटी स्क्वेअर अर्थात मुंबईचे भगिनी शहर असलेल्या परदेशातील विविध राष्ट्रांचे झेंडे उभारले जाणार आहे. याठिकाणी पृथ्वीचे ग्लोब उभारुन जी १५ भगिनी शहरे आहेत त्यांचे झेंडे पृथ्वीवरील त्या त्या परदेशांच्या ठिकाणी लावले जाणार आहे. त्यामुळे हिरवळ उभारुन हा जगाचा ग्लोब बनवला जाणार आहे. मुंबईतील भगिनी शहरांमध्ये तेथील कामांची आणि तेथील तंत्रांची देवाणघेवाण केली जाते. त्यानुसार भगिनी शहरांमधील महापौर आणि अधिकारी त्या त्या शहरांमध्ये जावून अभ्यास करत असतात. त्यामुळे आदित्य ठाकरे हे राजशिष्टाचार मंत्री असताना त्यांनी अशाप्रकारचा मुंबईच्या सिस्टर सिटी स्क्वेअरची उभारणी करण्याचा निर्णय घेत उपनगर जिल्हा नियोजनामार्फत निधी मंजूर केला होता.

मात्र, राज्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रस्तावित केलेल्या कामांना स्थगिती दिली होती. परंतु आता कलानगरमध्ये हे सिस्टर सिटी स्क्वेअर अंतर्गत विकास केला जाणार असून भविष्यात याची उभारणी झाल्यानंतर मुंबईला भेटी देणाऱ्या भगिनी शहरांचे महापौर आणि त्यांचे शिष्टमंडळ हे याठिकाणी भेटी देणार असल्याने कलानगरची वेगळी एक ओळख जगात निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.