Zakir Naik ला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करा; Hindu Janajagruti Samiti ची मागणी

संयुक्त राष्ट्र संघात Zakir Naik याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने (Hindu Janajagruti Samiti) केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.

292
Zakir Naik ला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करा; Hindu Janajagruti Samiti ची मागणी
मुंबई जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यावर हिंदु जनजागृती समितीचे सतिश सोनार यांच्यासह उपस्थित धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ
‘हिंदू मंदिरात काम करण्यासाठी जाणे सर्वात मोठे महापाप आहे, तसेच मंदिर वा चर्चमध्ये जाण्यापेक्षा हजारो लोकांना मारणार्‍या शस्त्र बनवणार्‍या कारखान्यात जाणे अधिक चांगले. मंदिर किंवा चर्च येथे ‘शिर्क’ (महापाप) केले जाते. ‘शिर्क’ हे इस्लामनुसार महापाप आहे. अल्लाहने स्पष्टपणे म्हटले आहे की, मी कोणालाही माफ करू शकतो, पण ‘शिर्क’ केलेल्याला कधीही माफ करत नाही…’, अशी अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये इस्लामिक रिसर्च फांऊडेशनचे (Islamic Research Foundation) डॉ. झाकीर नाईक (Zakir Naik) याने ‘हुडा टी.व्ही.’ नावाच्या यू-ट्यूब चॅनलवर मुलाखत देतांना केली आहेत.
आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचे दुष्कृत्य
यातून कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या हिंदू मंदिरांविषयी (Hindu temples) समाजात जातीय विद्वेष, घृणा आणि शत्रुत्वाची भावना पसरवून आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचे दुष्कृत्य झाकीर नाईक याने केले आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने (Hindu Janajagruti Samiti) केंद्रीय गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई जिल्हाधिकारी यांची कार्यालयात भेट घेऊन त्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या (Ministry of Home Affairs) नावाने निवेदन सादर केले आहे. या वेळी निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे सतिश सोनार यांच्यासह हिंदु धर्मप्रेमी सर्वश्री रविंदर दासारी, संदीप तुळसकर, सुशील भुजबळ, विलास निकम आणि मनीष सैनी उपस्थित होते.
केंद्र सरकारने आतंकवादी संघटना म्हणून बंदी घातल्यानंतरही झाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशन यांचे फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम आदी सर्व अनेक सामाजिक माध्यमांवरील सर्व अकाऊंट सुरू आहेत. ती सर्व त्वरित बंद करण्यात यावीत अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.