डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मुंबईतील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना बुधवार, ६ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने ही सुट्टी जाहीर केली आहे. हा आदेश मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू असणार आहे.
शासनाने सुट्टीसंबंधी काढलेल्या परिपत्रकात सांगितले आहे की, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी ‘अनंत चतुदर्शी’च्या दिवशी आणि 2007 पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्तान मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता 2023 मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना तिसरी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रचंड भीमसागरासाठी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सुट्टीची मागणी केली होती. 6 डिसेंबर या दिवशी सर्वांनाच चैत्यभूमीवर अभिवादन करणे शक्य व्हावे, यासाठी मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करा, अशी मागणी करणारे पत्र वर्षा गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.
Join Our WhatsApp Community