Ujani Dam : उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात घट

गतवर्षी जानेवारी महिन्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध असलेल्या धरणातील पाणी पातळीने यंदा मात्र तळ गाठल्याचे दिसते. गेल्या तीन महिन्यांत उजनीतील सुमारे ३२ टीएमसी पाण्याचा वापर झाल्याने पाणी पातळीने मृतसाठ्यात प्रवेश केला आहे.

160
Ujani Dam : अडीच महिन्यांत उजनी धरणात आले १३१ टीएमसी पाणी

पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणातील (Ujani Dam) पाणीसाठा कमी झाला आहे. दरवर्षी जानेवारीतही शंभर टक्के पाणीसाठा असण्याच्या श्रृंखलेस यंदा मात्र खंड पडला आहे. (Ujani Dam)

गतवर्षी जानेवारी महिन्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध असलेल्या धरणातील पाणी पातळीने यंदा मात्र तळ गाठल्याचे दिसते. गेल्या तीन महिन्यांत उजनीतील सुमारे ३२ टीएमसी पाण्याचा वापर झाल्याने पाणी पातळीने मृतसाठ्यात प्रवेश केला आहे. धरणातील पाण्याचा सुरु असलेला अपव्यय यंदा दुष्काळाचे तीव्र चटके दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रतिक्रिया बॅकवॉटरलगतच्या शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. (Ujani Dam)

(हेही वाचा – Ayodhya: राम मंदिराबाहेरील गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांचे पथक अपुरे, चुकीची घटना घडू नये यासाठी एटीएस कमांडो दाखल)

सन २०२० पासून दरवर्षी धरणात जानेवारीत शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असे. गतवर्षी २० जानेवारीपर्यंत धरण शंभर टक्के भरलेले होते. यंदा मात्र याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जानेवारीत धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला असून, धरणातील पाणी पातळीने मृतसाठ्यात प्रवेश केला आहे. यंदा धरण ६० टक्के (९५ टीएमसी) भरले होते. यामध्ये ६३ टीएमसी मृत पाणीसाठा आहे. तर ३२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. (Ujani Dam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.