Deenanath Mangeshkar Hospital ने गरीब रुग्णांसाठीचा ३० कोटींचा निधी वापरला नाही; चौकशी अहवालातून माहिती उघड

97
Mangeshkar Family ला केले जाते जाणीवपूर्वक टार्गेट; गोवा मुक्ती संग्रामातील योगदानाकडे सोयीस्कर दुर्लक्ष

पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामुळे धर्मादाय रुग्णालयात (Charity Hospital) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उपचारांचा प्रश्न समोर आला आहे. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही, हे पाहण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने रुग्णालयाला भेट देऊन अहवाल शासनाला सादर केला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा ३० कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आल्याचे समोर येत आहे.

(हेही वाचा – Cyber ​​Crime : डिजिटल अरेस्टद्वारे ३.५ कोटी रुपयांची फसवणूक; पोलिसांनी ८ जणांना घेतले ताब्यात)

रुग्णालयाने धर्मादाय रुग्णालयांसाठीच्या नियमावलीचे पालन केले नसल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. अहवालात संबंधितांचे जबाबही आहेत. धर्मादाय सहआयुक्त, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अधिकारी, जे.जे.चे अधीक्षक, विधी व न्याय विभागाचे उपसचिव/ अवर सचिव हे चौकशी समितीत होते. काही दिवसांपूर्वीच या समितीने रुग्णालयाला भेट देऊन अहवाल शासनास सादर केला होता.

गरिबांसाठी आहे सरकारचे प्रावधान

राज्यात ४८६ धर्मादाय रुग्णालये आहेत. गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी या रुग्णालयांत विशिष्ट प्रमाणात बेड्स आरक्षित असतात. उच्च न्यायालयाने २००४ मध्ये दिलेल्या निकालानुसार, धर्मादाय रुग्णालयांसाठी योजना आखून देण्यात आली आहे. निर्धन, गरीब रुग्णांसाठी (economically weaker patients) २० टक्के बेड्स राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्यात ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख ८० हजारांपर्यंत आहे, अशा रुग्णांकरिता १० टक्के बेड्स आरक्षित आहेत. त्यांच्यावर मोफत उपचार करणे अपेक्षित आहे.

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख ८० हजार ते ३ लाख ६० हजारांपर्यंत आहे, अशा रुग्णांसाठी १० टक्के बेड्स आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. या रुग्णांना ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार देणे बंधनकारक आहे. असे असूनही रुग्णालये यासंदर्भात टाळाटाळ करतांना दिसतात. (Deenanath Mangeshkar Hospital)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.