Deep cleaning Drive : मुंबईतील मंदिरांची २२ जानेवारीपर्यंत स्वच्छता

मुंबईतील मंदिर परिसरांमध्ये २२ जानेवारी २०२४ पर्यंत लोकसहभाग आणि श्रमदानातून सखोल स्‍वच्‍छता मोहीम (डीप क्‍लीन ड्राईव्‍ह) राबविण्‍याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. दररोज मुंबईतील मंदिरांच्‍या परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविली जाणारी आहे.

686
Deep cleaning Drive : मुंबईतील मंदिरांची २२ जानेवारीपर्यंत स्वच्छता
Deep cleaning Drive : मुंबईतील मंदिरांची २२ जानेवारीपर्यंत स्वच्छता

मुंबईतील मंदिर परिसरांमध्ये २२ जानेवारी २०२४ पर्यंत लोकसहभाग आणि श्रमदानातून सखोल स्‍वच्‍छता मोहीम (Deep cleaning Drive) राबविण्‍याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. दररोज मुंबईतील मंदिरांच्‍या परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविली जाणारी आहे. प्रत्‍येक प्रशासकीय विभागातील किमान तीन प्रमुख मंदिरांची स्‍थानिक पातळीवर निवड केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. (Deep cleaning Drive)

राज्याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्‍या निर्देशानुसार, मुंबईतील प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) दर आठवड्यात एक दिवस संपूर्ण स्वच्छ‍ता मोहीम राबविण्यात येत आहे. त्‍यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे स्वतः दर आठवड्यास न चुकता या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवित आहेत. महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीमेसाठी ६१ मुद्यांचा समावेश असलेली प्रमाणित कार्यपद्धती (SOP) निश्चित केली आहे. (Deep cleaning Drive)

(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा)

मंदिरांची स्‍थानिक पातळीवर निवड

महानगरपालिका राबवत असलेली संपूर्ण स्वच्छता मोहीम (Deep cleaning Drive) आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात ‘महास्वच्छता अभियान’ स्वरुपात राबविण्‍याचे निर्देश मुख्‍यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) दिले आहेत. सखोल स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) मुंबईतील मंदिरांची स्‍वच्‍छता आणि रोषणाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्‍यानुसार, महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मुंबई महानगरातील मंदीर परिसर स्‍वच्‍छतेकामी सखोल स्‍वचच्छता मोहीम राबविण्‍याच्या सूचना दिल्या आहेत. (Deep cleaning Drive)

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी २२ जानेवारी २०२४ पर्यंत दररोज मुंबईतील मंदिरांच्‍या परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविली जाणारी आहे. प्रत्‍येक प्रशासकीय विभागातील किमान तीन प्रमुख मंदिरांची स्‍थानिक पातळीवर निवड केली जाणार आहे. परिमंडळ सहआयुक्‍त, उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांना याबाबतचे निर्देश देण्‍यात आले आहेत. मंदीर स्‍वच्‍छता मोहिमेत मुंबईकर नागरिकांनी सहभागी व्‍हावे आणि श्रमदान करावे, असे आवाहनही अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. सुधाकर शिंदे यांनी यानिमित्‍त केले आहे. (Deep cleaning Drive)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.