Deep Cleaning : पाच वर्षांच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारी महिन्‍यात सर्वाधिक स्वच्छ हवा

मुंबई प्रदूषण नियंत्रण केंद्रे २० वरून आता २८ पर्यंत

219
Deep Cleaning : पाच वर्षांच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारी महिन्‍यात सर्वाधिक स्वच्छ हवा

वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने, वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रकल्‍पांसह विविध घटकांविरोधात कठोर उपाययोजना केल्या. स्वच्छता मोहिमेला व्यापक रुप देवून रस्ते, पदपथ, चौक, सार्वजनिक ठिकाणे धूळमुक्त करण्यावर भर दिला. परिणामी, मुंबईत गत पाच वर्षांच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारी महिन्‍यात सर्वाधिक स्वच्छ हवा असल्याचा निष्कर्ष अभ्यासाअंती पुढे आला आहे. महानगरपालिकेच्या सखोल स्वच्छता मोहिमेचे (Deep Cleaning) हे यश आहे, असे प्रतिपादन राज्‍याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. गत वर्षभरात प्रदूषण नियंत्रण केंद्रे २० वरून आता २८ पर्यंत वाढविण्‍यात आली आहेत, त्‍यामुळे अधिक क्षेत्र नियंत्रणात आल्‍याचेही मंत्र्यांनी नमूद केले. (Deep Cleaning)

एन विभागामध्ये घाटकोपर पूर्व तर एल विभागात कुर्ला पश्चिम परिसरामध्ये शनिवारी ९ मार्च २०२४ रोजी सखोल स्‍वच्‍छता मोहीम (Deep Cleaning) राबविण्‍यात आली. त्‍यावेळी प्रसार माध्‍यमांशी संवाद साधताना पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे बोलत होते. महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांच्‍या निर्देशानुसार, स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी महानगरपालिकेकडून २५ प्रशासकीय विभागात सखोल स्‍वच्‍छता मोहीम (डीप क्‍लीन ड्राईव्‍ह) राबविण्‍यात येत आहे. महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार ही मोहीम सलग १५ आठवडे सुरू असून सर्वत्र स्थानिक नागरिकांचा चांगला सहभाग मिळतो आहे. (Deep Cleaning)

पथनाट्याद्वारे जनजागृती

शनिवारी पार पडलेल्या मोहिमेत पालकमंत्री लोढा यांच्यासह आमदार पराग शहा, आमदार दिलीप लांडे, महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्‍त (परिमंडळ ६) रमाकांत बिरादार, उप आयुक्‍त (परिमंडळ ५) देवीदास क्षीरसागर, उप आयुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे यांच्‍यासह एन विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्‍लाळे, एल विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर आणि इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. स्‍थानिक लोकप्रतिनिधी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्‍वयंसेवी संस्‍थांचे प्रतिनिधी आणि नागरिक यांनी देखील स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पथनाट्याद्वारे जनजागृती करण्‍यात आली. (Deep Cleaning)

(हेही वाचा – Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील ‘हे’ दोन पक्ष NDA सोबत; भाजपाची ताकद वाढली)

स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी ही मोहीम

मोहिमेच्या (Deep Cleaning) निमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री मंगल प्रभात लोढा म्‍हणाले की, रस्ते, पदपथ, लहान-सहान गल्लीबोळांमध्ये असलेला घनकचरा तसेच टाकाऊ वस्तू पूर्णपणे काढणे, तसेच ब्रशिंग करुन रस्ते, पदपथांवरील धूळ काढणे, त्यानंतर पाण्याने धुणे ही सर्व कार्यवाही करतानाच रस्‍त्‍यांवर उगवलेली खुरटी झाडीझुडपे समूळ काढणे, अवैध जा‍हिरात फलक हटविणे, कीटकनाशक धूर फवारणी, पावसाळी जाळ्या-गटारे व नाले यांची स्‍वच्‍छता, धोकादायक तारांचे जंजाळ काढणे आदी विविध कामे सखोल स्वच्छता मोहिमेतून करण्यात येत आहेत. गत १५ आठवड्यांपासून मुंबई महानगरात सुरू असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईतील वायू गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. स्वच्छता मोहिमेमुळे (Deep Cleaning) मुंबईकरांचे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यात मदत होत आहे. मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी ही मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे, असे त्यांनी नमूद केले. (Deep Cleaning)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल म्‍हणाले की, मुंबई स्वच्छ ठेवणे, सुंदर ठेवणे ही केवळ महाराष्ट्र शासन किंवा महानगरपालिकेची जबाबदारी नसून, ते प्रत्येक मुंबईकराचे कर्तव्य आहे. विविध सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये, तरुण आणि लोकप्रतिनिधी आदींनी या चळवळीत सहभागी व्हावे. ज्या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम सुरू असेल तेथे प्रत्येक नागरिकाने सहभागी होवून आपला परिसर अधिकाधिक स्वच्छ ठेवावा, असे आवाहनही डॉ. चहल यांनी केले. घाटकोपर पूर्व येथील नायडू कॉलनी मार्ग, शास्‍त्रीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कल, कुर्ला पश्चिम येथील काजूपाडा आणि सेंट ज्‍यूड शाळा चौक परिसरात आज स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात आली. स्वच्छता कशा प्रकारे करणे अपेक्षित आहे, याचे प्रात्यक्षिक देखील आयुक्त डॉ. चहल यांनी नागरिकांना करुन दाखवले. (Deep Cleaning)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.