पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९नंतर भरवण्याच्या निर्णयावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आचारसंहितेनंतर निर्णय देणार आहेत, असे आश्वासन त्यांनी सोमवारी, (२२ एप्रिल) दिले आहे. राज्य सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालक आणि बसचालकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यामुळे सर्वांच्या समस्या ऐकून घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. (Deepak Kesarkar)
बदलत्या वेळापत्रकानुसार, माध्यमिक शाळांचे वेळापत्रक कोलमडत असेल आणि वर्गखोल्यांचा प्रश्न येत असेल, तर ‘माध्यमिक’चे वर्ग सकाळी लवकर भरवू, असे संकेतही त्यांनी दिले.
(हेही वाचा – IPL 2024, MI vs RR : रोहित शर्माचा पहिल्याच षटकांत बळी गेला आणि गोलंदाजाच्या नावावर लागला हा विक्रम)
समस्या ऐकून घेण्याचे आश्वासन…
सकाळी वाहतूक कोंडी, प्रदूषण, वर्गखोल्यांची संख्या, अशा अनेक समस्या मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. प्रत्येक आपआपले प्रश्न मांडावेत. सविस्तर ऐकून घेतले जातील. सकाळच्या शाळेमुळे मुलांची झोप अपुरी होते, असे शास्त्रज्ञांनीच सांगितले आहे. त्यामुळे पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळांच्या वेळेत बदल केला आहे. यामुळे पालक, बसचालक यांच्यावर काही परिणाम होत असेल, तर त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जातील. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर यावर तोडगा काढणार, असे आश्वासन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी…
मुंबई-पुण्यासह राज्यभरात पुरेशा वर्गखोल्याअभावी असंख्य शाळा एकाच इमारतीमध्ये दोन सत्रांत भरतात. दोन सत्रांत चालणाऱ्या शाळांची संख्या जास्त आहे. शाळा उशिरा सुटल्यास विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही पालकांचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community