Azad Maidan : शिवसेनेला हवाय आझाद मैदानातही शिवरायांचा पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील आझाद मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा विचार शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी बोलून दाखवला आहे.

149
Azad Maidan : शिवसेनेला हवाय आझाद मैदानातही शिवरायांचा पुतळा
Azad Maidan : शिवसेनेला हवाय आझाद मैदानातही शिवरायांचा पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील आझाद मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा विचार शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी बोलून दाखवला आहे. आझाद मैदानातही शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला गेला पाहिजे अशी विचार त्यांनी मांडले असून यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले. यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पडला असून शिवतिर्थावर आपला दसरा मेळावा घेता न आलेल्या शिवसेनेला आता आझाद मैदानाला शिवतिर्थाचे स्वरुप द्यायचे असल्याने या मैदानावर शिवरायांचा पुतळा उभारण्याची संकल्पना पालकमंत्र्यांची आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे. (Azad Maidan)

मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर हे महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी आझाद मैदानासंदर्भात कधी कुणीच विचार केलेला दिसत नाही. या मैदानावरही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा असायला हवा असे त्यांनी सांगितले. या आझाद मैदानासंदर्भात रेल्वेचे टर्मिनस असून व्हिक्टोरिया टर्मिनसचे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपतींचा पुतळा बसवण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे. त्यातच आता केसरकर यांनी या टर्मिनससमोरील आझाद मैदानात शिवरायांचा पुतळा बसवण्याचा विचार बोलून दाखवला. (Azad Maidan)

(हेही वाचा – Jammu & Kashmir : कुपवाडीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा)

महापालिकेच्या ठेवींसंदर्भात उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर यांनी महापालिकेच्या तिजोरीची लुट करणाऱ्यांची टर्म संपली आहे. सध्या प्रशासकीय काळ सुरु असून सध्या काय लूट झाली आहे असा सवाल केला आहे. पण त्यांनी काय लुट केली आहे हे लवकरच बाहेर येईल,असेही त्यांनी सांगितले. मुंबई महापालिका ही जनतेची असून त्याचा आता कायापालट व्हायला लागली आहे. पूर्वी जे घडले नाही ते आता घडायला लागले आहे. ज्या इमारतींच्या पुनर्विकासात प्रकल्प रखडल्याने तसेच प्रकल्प सुरु असूनही भाडे रखडले गेले होते, त्या विकासकांचे नाक दाबताच त्यांनी लोकांचे भाडे द्यायला सुरुवात केली, हे आमच्या काळात घडत आहे? का नाही आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात झाले असा सवालही त्यांनी केला. (Azad Maidan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.