‘भाभीजी घर पर है’ या शोमध्ये मलखान सिंहची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणाऱ्या दीपेश भानचे (Deepesh Bhan) वयाच्या 41 व्या वर्षी निधन झाले. क्रिकेट खेळताना दिपेश खाली कोसळला होता, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. दीपेश मलखान सिंगच्या भूमिकेत त्याच्या उत्कृष्ट कॉमिक टाइमिंगसाठी देशभरात प्रसिद्ध झाला होता. 2005 मध्ये त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
बिनाफेर कोहली यांच्या म्हणण्यानुसार, भान (Deepesh Bhan) हे ‘अति व्यायाम’ करत होते असं ऐकण्यात आलं आहे. कोहली म्हणाले, ‘तो जरा जास्त व्यायाम करून स्वतःच्या शरीराला त्रास करून घेत होता. मला याची जाणीव नव्हती नाहीतर मी त्याला आधीच ओरडलो असतो.’ ते म्हणाले की भान सकाळी व्यायाम करूनच मग सेटवर येत होते आणि आज ते क्रिकेट खेळायला थांबले. त्यांना खेळणं शक्य होत नव्हतं तरी ते खेळत होते. शेवटी त्यांच्या नाकातून किंवा कानातून रक्त आलं. आणि ते जमिनीवर कोसळले. ‘मला याबद्दल नक्की काही ठाऊक नाही मी फार काही विचारले नाही. मला त्याच्या पत्नी आणि मुलाची जास्त काळजी आहे’, असं कोहली म्हणाले होते. (Deepesh Bhan)
ETimes शी केलेल्या संवादात ‘अंगूरी भाबी’ उर्फ शुभांगीने सांगितले की, दीपेश भानचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. तिने अशी माहिती दिली की, ‘मी त्यांच्याच इमारतीत राहते. सुरुवातीला त्यांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचे समोर आले होते. पण आता ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तो मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता आणि तिथेच तो जमिनीवर पडला. त्याला आधी कोणतीही समस्या नव्हती. कोणताही आजार नव्हता. तो निरोगी होता.’ (Deepesh Bhan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community