Deepinder Goyal : झोमॅटोचे दिपिंदर गोयल अब्जाधीशांच्या यादीत

Deepinder Goyal : झोमॅटोच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीचा फायदा गोयल यांना मिळाला आहे.

114
Deepinder Goyal : झोमॅटोचे दिपिंदर गोयल अब्जाधीशांच्या यादीत
  • ऋजुता लुकतुके

झोमॅटोच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात झालेल्या वाढीमुळे कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष दिपिंदर गोयल यांची वर्णी अब्जाधीशांच्या यादीत लागली आहे. जुलै २०२३ पासून झोमॅटो शेअर तब्बल ३०० टक्क्यांनी वाढला आहे. आणि गोयल यांच्याकडे कंपनीचे ४.२४ टक्के शेअर आहेत, ज्यांचं मूल्य ८,३०० कोटी रुपये इतकं आहे. (Deepinder Goyal)

सोमवारी कंपनीच्या शेअरमध्ये २ टक्क्यांची वाढ झाली. आणि शेअर मुंबई शेअर बाजारात २३० रुपयांवर पोहोचला. त्यामुळे कंपनीचं बाजारातील भागभांडवल १.३ ट्रिलियन पर्यंत पोहोचलं आहे. गोयल फक्त ४१ वर्षांचे असताना अब्जाधीश झाले आहेत. २०२३ मध्ये कंपनीने ब्लिंकइट ही ई-कॉमर्स कंपनी सुरू केली. ही कंपनी अपेक्षेपेक्षा लवकर नफा कमवायला सुरुवात करणार असल्याचं समोर आल्यापासून झोमॅटो कंपनी शेअर बाजारात तेजीत आहे. (Deepinder Goyal)

(हेही वाचा – Congress मध्ये धुसफूस; विधान परिषद निवडणुकीनंतर नाराज आमदारांविषयी चर्चेला उधाण)

ब्लिंक-इट कंपनीची स्पर्धा स्विगी इन्स्टामार्ट आणि झेप्टोशी आहे. पण, इतर दोन कंपन्यांच्या तुलनेत ब्लिंक-इटची कामगिरी सरस आहे. करपूर्व नफा सुरूही झाला आहे. त्यामुळे झोमॅटो कंपनीही विस्ताराच्या नवीन योजना आखताना दिसत आहे. आणि झोमॅटोचा शेअरही वाढत आहे. (Deepinder Goyal)

गोल्डमन सॅच कंपनीच्या अहवालानुसार, झोमॅटोच्या तुलनेत ब्लिंक-इटचं मूल्यांकनही जास्त आहे. ब्लिंक-इटचं मूल्य आता १३ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचलं आहे. दिपिंदर गोयल हे आयआयटी दिल्लीतून गणित विषयात पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलेले गोयल यांना स्वत: वेगवेगळे अन्नपदार्थ चाखून बघायला आवडतात. त्या आवडीतून त्यांना ऑनलाईन अन्नपदार्थ मागवण्याची कल्पना सुचली. बेन कंपनीत काम करत असतानाच त्यांनी फूडबे डॉट कॉम नावाची कंपनी इन्फोएजच्या मदतीने लाँच केली आणि नंतर तिचं झोमॅटो असं नामकरण केलं आहे. २०११ पासून ते या क्षेत्रात आहेत. (Deepinder Goyal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.