चीनच्या कुरापती सुरूच…मोबाईलद्वारे हेरगिरी! भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला धोक्याचा इशारा

भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमेवरील तणाव कायम असून चीनच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत जात आहेत. सीमेवर चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संरक्षण गुप्तचर यंत्रणांनी धोक्याचा इशारा दिला आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा अंदाज! कुठे वाढते तापमान, तर कुठे अवकाळी पाऊस )

संरक्षण गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट 

चिनी मोबाईल फोनबाबत हा इशारा असून चीन मोबाईलद्वारे हेरगिरी करत असल्याची शक्यता भारतीय संरक्षण गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. गुप्तचर यंत्रणांनी याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी भारतीय सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना चिनी फोन विकत न घेण्याच्या सूचना दिल्या असून त्यांचा वापर करणेही टाळावे असा इशारा दिला आहे. सुरक्षा यंत्रणांना या मोबाईलमध्ये स्पायवेअर आढळले आहेत, अशी माहिती ANI ने ट्वीट करत दिली आहे.

चिनी अ‍ॅप, फोन वापरण्यास बंदी

मार्च २०२० पासून भारत चीन वाढल्यानंतर भारत सरकारने अनेक चिनी अ‍ॅप वापरण्यास बंदी आणली. तसेच चायनीज मोबाईल फोन वापरण्यासही प्रतिबंध करण्यात आले. मोबाईल फोनमध्ये विवो, ओपो, शाओमी, वन प्लस, हॉनर, रिअल मी, ZTE, जिओनी, अ‍ॅसस, Infinix यांचा समावेश होतो. गुप्तचर यंत्रणेने याआधी चिनी अ‍ॅप्सवर सुद्धा कारवाई केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here