Defence Accounts Department : संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते अकाऊंट्सशी संबंधित डिजिटल उपक्रमांचे अनावरण

110
Defence Accounts Department : संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते अकाऊंट्सशी संबंधित डिजिटल उपक्रमांचे अनावरण
Defence Accounts Department : संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते अकाऊंट्सशी संबंधित डिजिटल उपक्रमांचे अनावरण

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 1 ऑक्टोबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंट इथे संरक्षण लेखा विभागाच्या (DAD) 276 व्या वार्षिक दिनाच्या समारंभात अनेक डिजिटल उपक्रम सुरू केले. (Defence Accounts Department) या उपक्रमांमध्ये संरक्षण मंत्रालयासाठी एकात्मिक संरक्षण वित्त डॅशबोर्ड BISWAS आणि e-Raksha Awaas चा समावेश आहे. आपल्या संबोधनात संरक्षणमंत्र्यांनी संरक्षण लेखा विभागाचे वर्णन संरक्षण वित्ताचे पालक म्हणून केले आणि पारदर्शक तसेच कार्यक्षम प्रणालीद्वारे देशाच्या संरक्षण क्षमता वृद्धिंगत करण्याच्या दिशेने त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. अधिकतम उत्पादन काढताना संसाधनांचा विवेकपूर्ण वापर सुनिश्चित केल्याबद्दल त्यांनी संरक्षण लेखा विभागाचे कौतुक केले. (Defence Accounts Department)

(हेही वाचा – Raj Thackeray : उत्सव साजरा करा पण सामाजिक भान ठेवा काय म्हणाले राज ठाकरे त्यांच्या पोस्ट मध्ये)

2047 पर्यंDefence Accounts Department : संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते अकाऊंट्सशी संबंधित डिजिटल उपक्रमांचे अनावरणत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे सरकारचे लक्ष्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे स्वप्न साकार करण्यात संरक्षण लेखा विभाग महत्त्वाची भूमिका बजावेल, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. “आपल्याला विकसित राष्ट्र घडवायचे असेल तर आपल्याला आधुनिक शस्त्रास्त्रे आणि उपकरणांसह मजबूत सशस्त्र दलांची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या आर्थिक स्रोतांचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे“ असे ते म्हणाले. “सेवांची मागणी आणि उपलब्ध संसाधनांचे वाटप यामध्ये योग्य संतुलन असायला हवे“ असे त्यांनी सांगितले. (Defence Accounts Department)

भारतातील संरक्षणविषयक आर्थिक माहिती प्रदान करणारा सारांश

SARANSH (संरक्षण मंत्रालयासाठी लेखा, अर्थसंकल्प आणि खर्चाचा सारांश) संपूर्ण भारतातील संरक्षणविषयक समग्र आर्थिक माहितीचे प्रदान, लेखा, अंदाजपत्रक इत्यादींच्या माहिती विश्लेषणाचा लाभ घेत अधिक अचूक आणि वस्तुनिष्ठ प्रतिमा प्रतिबिंबित करण्याच्या उद्देशाने संरक्षण लेखा विभागात कार्यरत विविध माहिती तंत्रज्ञान प्रणालींचे वेगवेगळे माहितीकोश संकल्पित आणि विकसित केले आहेत. ‘सारांश’ उच्च व्यवस्थापनासाठी आणि सर्व संरक्षण संस्थांच्या केंद्रीकृत देखरेखीसाठी तसेच समग्र माहिती -आधारित निर्णयांकडे जाण्यासाठी सर्व संरक्षण खर्चाच्या ओझरत्या दृश्यमानतेसाठी संपूर्ण डॅशबोर्ड म्हणून काम करेल.

नौदल विभागांसाठी BISWAS

BISWAS विविध लष्करी/नौदल विभागांसाठी डॅशबोर्ड म्हणून काम करेल आणि मुख्य कार्यप्रदर्शक सूचक (KPIs) अहवालांसह बिल व्यवस्थापनाच्या संपूर्ण प्रक्रियेच्या प्रवाहाचे परीक्षण आणि विश्लेषण करण्याच्या उद्देशाने भिन्न माहितीकोश प्रदर्शित करेल.

संरक्षण सेवेतील भाड्याच्या इमारतींसाठी ई-रक्षा आवास

ई-रक्षा आवास ही एक केंद्रीकृत आणि सर्वसमावेशक संगणकीय प्रणाली आहे जिच्या मदतीने संरक्षण सेवेतील भाड्याच्या इमारतींसाठी वेळेवर भाडे आणि संबंधित शुल्क निर्माण करण्याच्या प्रक्रियेला सुव्यवस्थित आणि सर्वोत्कृष्ट करण्यासाठी तसेच सरकारी खात्यांमध्ये भाडे आणि संबंधित शुल्काचा त्वरित परतावा सुविधा देण्यासाठी विकसित केले आहे.

राजनाथ सिंह यांनी प्रमुख विभागीय प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अनुकरणीय उपक्रम हाती घेतलेल्या पाच संघांना यावेळी संरक्षण मंत्री उत्कृष्टता पुरस्कार 2023 प्रदान केले. लष्कर प्रमुख जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार, वित्तीय सल्लागार (संरक्षण सेवा) रसिका चौबे, संरक्षण लेखा नियंत्रक एस जी दस्तीदार आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. (Defence Accounts Department)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.