YouTube : ’देहाती मॅडम’ आहे युट्यूब स्टार; कमावते लाखो रुपये

200
यशोदा लोधीने एका व्हिडीओमध्ये आपली कहाणी सांगितली आहे. तिला सोशल मीडियावर ‘देहाती मॅडम’ या नावानेही ओळखलं जातं. ती आपल्या युट्यूब चॅनलद्वारे लोकांना इंग्रजी कसे बोलावे ते शिकवते. तसेच इंग्रजी बोलण्याच्या वेगवेगळ्या टिप्स देते.

कोण आहे ही देहाती मॅडम?

सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक आपलं टॅलेंट दाखवताना दिसतात. कितीतरी लोक या माध्यमातून चांगली कामाईही करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बाईबद्दल सांगणार आहोत जी सोशल मीडियावर ‘देहाती मॅडम’ या नावाने प्रसिद्ध आहे. या बाईचं नाव आहे ‘यशोदा लोधी’. ही बाई महिन्याला घरबसल्या जेवढे पैसे कमावते तेवढे पैसे कोणी कामावर जाऊनदेखील कमवू शकणार नाही.
यशोदा ही उत्तर प्रदेशातील कोशाम्बी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहते. यशोदेची माहेरची परिस्थिती खूप हलाकीची होती. तिच्या आई वडिलांना मुलगी नको होती म्हणून यशोदेला तिच्या आत्याकडे पाठवण्यात आलं. आत्या आणि आत्याच्या नवऱ्याने तिचा सांभाळ केला आणि चांगलं शिक्षणही दिलं. हिंदी मिडियम मधून बारावी पास केल्यानंतर यशोदेने ट्यूशन देणं सुरू केलं. तिने कोशाम्बी जिल्ह्यातल्या कॉलेजमध्येच ग्रॅज्युएशनसाठी ऍप्लिकेशन दिलं. यादरम्यान तीची तिच्या पतीशी भेट झाली. आत्या आणि आता आत्याचा नवरा म्हातारा झाल्यावर तिला पुन्हा तिच्या आई बाबांकडे पाठवण्यात आलं. घरातल्या माणसांना तिचं तिच्या पतीशी असलेलं नातं मान्य नव्हतं म्हणून तिला घरातून बाहेर हाकलून देण्यात आलं.
तिला खूप हतबल वाटायला लागलं. पण ती पुन्हा जोमाने उभी राहिली. आपल्या आयुष्याची निर्णय आपण स्वतः घ्यायचे असं तिने ठरवलं. तिने आपल्या आवडत्या माणसाशी लग्न केलं पण तिच्या सासरच्यांनीही तिचा स्वीकार केला नाही. तेव्हा नवराबायकोने मिळून आपला राजाराणीचा संसार सुरू केला. तिचा नवरा आठवी शिकलेला आहे. तो मजुरी करून आपलं कुटुंब पोसत होता. पण लग्नाच्या दोन वर्षानंतर यशोदाच्या नवऱ्याचं एक्सिडेंट झालं. त्याचा पाय ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला होता. तेव्हा त्यांना पैशाचं महत्त्व पटलं.
नोव्हेंबर 2021 साली यशोदाने आपला पहिला मोबाईल फोन खरेदी केला. त्यावर मोटिव्हेशनल स्पीकर संदीप महेश्वरीच्या शब्दांनी प्रेरणा घेऊन तिने ठरवले की, आता आपल्या कुटुंबासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे असं ठरवलं. तिने युट्युबवर आपले इंग्लिश स्पिकिंगचे व्हिडीओ अपलोड करायला सुरू केलं. सुरवातीला तिचे व्हिडीओ जास्त व्हायरल झाले नाहीत. पण हळूहळू यशोदा युट्युबवर प्रसिद्ध झाली आणि आज ती लाखोंच्या घरात कमाई करतेय.
एका स्त्रीने ठरवलं तर ती काहीही करू शकते हे यशोदाने दाखवून दिलं आहे. यशोदा आपल्या टॅलेंटच्या जोरावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भरपूर कमाई करतेय. यशोदा म्हणते की, ‘एखादी बाई जर साडी नेसलेली, डोक्यावर पदर घेतलेली असेल तर ती अडाणीचं असायला पाहिजे. असे अजिबात नाहीय. ती बाई शिकलेलीही असते. देशावर शासनही करू शकते आणि इतर महिलांना प्रेरितही करू शकते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.