मुंबईतील वाढत्या उष्णतेचा पशू-पक्ष्यांना फटका! रुग्णालयाने जारी केली धक्कादायक आकडेवारी

100

मुंबईकरांना सध्या सतत बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. सामान्यत: मे महिन्यामध्ये मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद केली जाते परंतु यंदा मार्च-एप्रिलपासूनच मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसण्यास सुरूवात झाली आहे. मार्चमध्ये ३९ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. या वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या हवामानाचा फटका पशू-पक्ष्यांवरही होत आहे.

( हेही वाचा : शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! एल-निनोमुळे सतर्कतेचा इशारा, मान्सूनबाबत स्कायमेटने जारी केला अहवाल)

याबाबत परेलमधील “बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट रुग्णालयाने” एक चिंताजनक खुलासा केला आहे. या रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार डिहायड्रेशनच्या त्रासामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या पशू पक्ष्यांच्या संख्येत मार्चच्या तुलनेत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. यात जवळपास तीस वेगवेगळ्या प्रजातींच्या पशू पक्ष्यांच्या समावेश आहे.

‘या’ पशू – पक्ष्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले –

कासव, कावळा, कबूतर, गरुड, घुबड, पोपट

हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले …

मार्च महिन्यात दरदोज २ – ३ पशू किंवा पक्षी दाखल होत होते. मात्र गेल्या सात दिवसांमध्ये यामध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. बऱ्याच केसेसमध्ये आरोग्य पूर्ववत होण्यासाठी पक्ष्यांना दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो.

बऱ्या झालेल्या पक्ष्यांना कुठे सोडण्यात येते?

  • कावळा, कबूतर अशा पक्ष्यांना हॉस्पिटलमधील मोकळ्या जागेत
  • जंगली पक्ष्यांना बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात

तापमानावाढीचा पशूंवर होणारा परिणाम …

  • उष्माघात
  • डिहायड्रेशन
  • शारिरीक तापमानात वाढ

मुंबईतल्या तापमान वाढीचा ‘या’ प्राण्याला होतो सर्वात जास्त त्रास …

  • जिथे एअर कंडीशनमध्ये राहण्याऱ्या माणसांना ही वाढती उष्णता सहन होत नाही, तिथे रस्त्यावर राहणाऱ्या श्वानांना याचा किती त्रास होत असेल
  • अशी चिंता श्वान प्रेमींनी व्यक्त केली आहे. निवाऱ्याची कमतरता आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव यामुळे श्वानांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मुंबईत तीव्र तापमान वाढ का होते आहे?

  • वाढते शहरीकरण
  • बदलते वातावरण
  • वायू प्रदूषण
  • जंगलतोड
  • दमट वातावरण
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.