दिल्लीतील तीन मंदिरे (Temple) पाडण्याचा निर्णय दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) घेतला आहे. त्यावर स्थगिती आणण्याची मागणी ज्येष्ठ विधिज्ञ विष्णू शंकर जैन यांनी केली. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पण न्यायालयाने त्यावर सुनावणी करण्यास नकार देत या मंदिरांच्या व्यवस्थापन समित्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
पूर्व दिल्ली काली बारी समिती, श्री अमरनाथ मंदिर संस्था, श्री बद्रीनाथ मंदिरहे मंदिर (Temple) ही तीन मंदिरे मयूर विहार फेज २ मध्ये आहे. त्यांच्या वतीने उपस्थित असलेले वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, डीडीएने बुधवारी, १९ मार्च २०२५ ला पाडण्याची नोटीस दिली आणि २० मार्चला पाडण्याचे काम केले जाईल, असे म्हटले आहे. मंदिर (Temple) समित्यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मागण्या ऐकल्या गेल्या नाहीत.
मंदिर समित्यांनी आरोप केला आहे की, या मंदिरांना दुर्गा पूजा आयोजित करण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आली होती आणि ती ३५ वर्षे जुनी आहेत. मंदिर समित्यांनी असेही म्हटले आहे की, मंदिरे (Temple) पाडण्याचा आदेश धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नकारानंतर, हे मंदिर लवकरच पाडले जाऊ शकते. डीडीएचे अधिकारीही मंदिरे पाडण्यासाठी पोहोचले होते परंतु स्थानिक आमदार रविंदर सिंह नेगी आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्तक्षेपामुळे कारवाई थांबवण्यात आली.
Join Our WhatsApp Community