सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही देशाची राजधानी दिल्लीत दिवाळीच्या रात्री जोरदार आतिषबाजी झाली. यामुळे दिल्लीची हवा पुन्हा एकदा विषारी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे देशाची राजधानी दिल्लीतील हवा थोडी स्वच्छ झाली होती. वातावरणात पारदर्शकता आली होती आणि श्वास घेताना त्रास होत नव्हता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या तमाम आदेशांना बगल देत दिल्लीकरांनी दिवाळीच्या दिवशी खूप आतिषबाजी केली. यामुळे हवा विषारी झाली आहे. हवेच्या पातळीने धोकादायक वळण ओलांडले आहे. (Delhi Air Pollution)
सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली होती. मात्र दिल्ली आणि एनसीआरमध्ये न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसली. दिवाळीनंतर सोमवारी सकाळी अनेक भागातून धक्कादायक चित्र समोर आले आहे. हवेत धुक्याचा जाड थर दिसू लागला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात प्रचंड प्रदूषण दिसून येत आहे. (Delhi Air Pollution)
(हेही वाचा – Crime : १५ कोटी रुपयांच्या कोकेनसह परदेशातील २ जणांना एनसीबीकडून अटक)
सीपीसीबीच्या अहवालानुसार दिल्लीतील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत पोहोचली आहे. दिल्लीच्या विविध भागातून धुक्याचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटला जोडणारा कर्तव्य पथ प्रदुषणामुळे पूर्णपणे झाकोळला गेला असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, आझादपूर, राजघाट आणि नोएडा येथील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत पोहोचली आहे. दिवाळीच्या दिवशी दिल्लीत सकाळची हवा गेल्या आठ वर्षांतील सर्वात चांगली झाली होती. (Delhi Air Pollution)
आकाश निरभ्र दिसून येत होते. शिवाय पारदर्शकता दिसून येत होती. पण दिवाळीच्या रात्री दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढली. दिल्लीच्या विविध भागांतील रस्ते दाट धुक्याने माखलेले असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यामुळे दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली. सोशल मीडिया साइट्सवरील पोस्ट्स आणि रिपोर्ट्सवरून असे दिसून येते की लोकांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले आहेत. (Delhi Air Pollution)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community