- प्रतिनिधी
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारच्या वतीने अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यातच बुधवारपासून ५० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गाला हा आदेश लागू होणार नाही.
तसेच या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी, बुधवारी (२० नोव्हेंबर) सचिवालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी अधिकारी वर्गाला वेगवेगळ्या सूचना दिल्या. राय यांनी आपल्या X खात्यावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. याआधी मंगळवारी पत्रकार परिषदेत गोपाल राय यांनीही दिल्लीत सम-विषम नियम लागू करण्याचे संकेत दिले होते. (Delhi Air Pollution)
प्रदुषण कम करने के लिए दिल्ली सरकार ने सरकारी दफ़्तरो में वर्क फ्रॉम होम का लिया निर्णय
50% कर्मचारी करेंगे घर से काम
इसके इम्पलिमेंटेशन के लिए सचिवालय में आज दोपहर 1 बजे अधिकारियों के साथ होगी बैठक
— Gopal Rai (@AapKaGopalRai) November 20, 2024
(हेही वाचा – महाराष्ट्रातील जनता विकासाला भरभरुन मतदान करेल: CM Eknath Shinde)
यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत दिल्ली सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये घरून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ५० टक्के कर्मचारी घरून काम करतील. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सचिवालयात अधिकाऱ्यांची बैठक झाली.
प्रदूषण कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत दिल्ली सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये घरून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ५० टक्के कर्मचारी घरून काम करतील. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये घरून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सरकारी कार्यालयातील ५० टक्के कर्मचारी घरून काम करतील. (Delhi Air Pollution)
प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये घरून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यातच दिल्लीतील सरकारी कार्यालये आणि महापालिकेच्या कामकाजाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत बदललेल्या वेळा कायम राहतील, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवांचा पुरवठा वगळता सर्व मोठ्या वाहनांची दिल्लीतील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या डिझेलवरील बसेसलाही बंदी घालण्यात आली आहे. (Delhi Air Pollution)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community