Delhi Air Pollution : दिल्लीमध्ये मास्क अनिवार्य; प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त

27
Delhi Air Pollution : दिल्लीमध्ये मास्क अनिवार्य; प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
  • प्रतिनिधी 

शनिवारी सकाळीही दिल्लीतील प्रदूषण अत्यंत धोकादायक पातळीवर नोंदवले गेले. सकाळी 7 वाजता दिल्लीतील 10 हून अधिक स्थानकांवर AQI 400+ ची नोंद झाली. जहांगीरपुरीमध्ये AQI 445 ची सर्वोच्च पातळी गाठली.

प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अतिशी यांनी सरकारी कार्यालयांच्या नव्या वेळा जाहीर केल्या. केंद्र सरकारची कार्यालये सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत, दिल्ली सरकारी कार्यालये सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 आणि MCD कार्यालये सकाळी 8.30 ते सायंकाळी 5 या वेळेत काम करतील. (Delhi Air Pollution)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : ‘मुंब्रा ड्रग्स मुक्त करणार’ अजित पवारांचा दावा)

शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग चालवण्याची घोषणा शुक्रवारीच करण्यात आली. आता सहावी ते बारावीपर्यंतच्या शाळांना मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारने लोकांना खाजगी वाहने न चालवण्याचे आवाहन केले आहे. यासाठी 106 अतिरिक्त क्लस्टर बस आणि मेट्रोच्या 60 ट्रिप वाढवण्यात आल्या आहेत, जेणेकरून लोक खाजगी वाहनांचा कमी वापर करतात. एअर कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ने देखील NCR मधून येणाऱ्या बसेसला म्हणजेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून दिल्लीला येण्यास बंदी घातली आहे. (Delhi Air Pollution)

(हेही वाचा – Voting boycott : मुंबईतील ‘या’ भागातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार; हे आहे कारण)

काय आहेत नियम – 
  • दिल्ली-एनसीआरमध्ये तोडफोडीवर बंदी, डिझेल वाहनांवर बंदी
  • दिल्ली-एनसीआरमध्ये बांधकाम, खाणकाम आणि पाडकामावर बंदी असेल.
  • BS-3 पेट्रोल आणि BS-4 डिझेल 4 चाकी गाड्या दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगरमध्ये धावणार नाहीत. उल्लंघन केल्याप्रकरणी 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
  • बीएस-३ डिझेलच्या आपत्कालीन वाहनांव्यतिरिक्त, या पातळीच्या सर्व मध्यम मालाच्या वाहनांवर दिल्लीत बंदी घालण्यात आली आहे.
  • याशिवाय जड वाहतूक असलेल्या मार्गांवर मशिनच्या साह्याने रस्ते स्वच्छ करण्याची वारंवारता वाढवणे आणि पीक अवर्सपूर्वी पाणी शिंपडणे यासारख्या उपाययोजना केल्या जातील. (Delhi Air Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.