Air Pollution : दिल्लीची हवा पुन्हा प्रदूषित; नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमुळे धोका आणखी वाढणार

दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा आलेख सातत्याने घसरत चालला आहे आणि नवीन वर्षाच्या उत्सवामुळे हवेची गुणवत्ता आणखीनच बिघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

186
Air Pollution : दिल्लीची हवा पुन्हा प्रदूषित; नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमुळे धोका आणखी वाढणार

दिल्लीत (Delhi) कडक्याच्या थंडीसोबतच हवेची गुणवत्ता (Air Pollution) देखील खराब होताना दिसत आहे. दिल्लीतील लोकांना विषारी हवेचा श्वास घ्यावा लागतो. हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब झाली आहे. शनिवारी पुन्हा AQI400 च्या जवळ पोहोचला आहे. वाढत्या थंडीमुळे तापमानात सातत्याने घसरण होत आहे. परिणामी परत दाट धुके पसरण्याची शक्यता आहे. त्यातच नववर्षाचे सेलिब्रेशन मध्ये फटाक्यांमुळे शहराची हवा खराब होऊ शकते. (Air Pollution)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही परिस्थिती किमान तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या पूर्व संध्येला लोक फटाक्यांची आतषबाजी करू शकतात. सध्या दिल्लीत फटक्यांवर पूर्णपणे बंदी आहे तरी त्याचा परिणाम दिसून येत नाही. (Air Pollution )

(हेही वाचा : Vande Bharat Manufactured in Latur : लातूरमध्ये होणार ‘वंदे भारत’ची निर्मिती; फडणवीसांनी दिली माहिती)

हवेची गुणवत्ता का खालवली

हवामान विभागाच्या एका आधिकाऱ्याने सांगितले की, हवेची गुणवत्ता खराब होण्याची कारण म्हणजे कमी तापमान आणि वाऱ्याचा कमी वेग यामुळे वातावरणात स्थिरता येते. दिवसभरात क्वचितच सूर्यप्रकाश असल्याने वाऱ्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे प्रदूषकांना पसरण्याची संधी मिळाली नाही. पुढील काही दिवस असेच हवामान असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
सलग तीन दिवस दिल्लीची हवा खराब
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता ही 400 AQI वर पोहोचली आहे. आणि सध्या नवीन वर्षाचे सेलिब्रेशन पाहता ते सहज 400 पार करण्याचा धोका आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.