कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे रस्त्यावर थुंकण्याची चूक केल्यास शिक्षेची रक्कम कमी असते, पण दिल्लीत एका विशेष जागी थुंकल्यास (spitting) चक्क भलीमोठी रक्कम भरण्याचा दंड (Fine) ठोठावण्यात येणार आहे.
ही विशेष जागा म्हणजे ‘भारत मंडपम’. (Delhi Bharat Mandapam) जी-२० परिषदेच्या वेळी चर्चेत आलेल्या भारत मंडपमची निर्मिती १२३ एकरांवर केली असून त्यासाठी २७०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहेत. तिथे असणाऱ्या सोयीसुविधादेखील महागड्या आहेत. त्यामुळे या जागेवर थुंकल्यास १ लाख रुपायांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
(हेही वाचा- Pimpri-Chinchwad: जलतरण तलावाच्या शुद्धीकरणासाठी गॅसऐवजी क्लोरिन पावडर वापरणार )
येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडपाला विद्रुप केल्यास किंवा तेथे कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्यास सहन केलं जाणार नाही. त्यामुळे या विशेष जागी थुंकल्यास १ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.