Delhi Building Collapse : दिल्लीत वादळामुळे 4 मजली इमारत कोसळली ; 4 जणांचा मृत्यू , ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले

Delhi Building Collapses : दिल्लीत वादळामुळे 4 मजली इमारत कोसळली ; 4 जणांचा मृत्यू , ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले

96
Delhi Building Collapse : दिल्लीत वादळामुळे 4 मजली इमारत कोसळली ; 4 जणांचा मृत्यू , ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले
Delhi Building Collapse : दिल्लीत वादळामुळे 4 मजली इमारत कोसळली ; 4 जणांचा मृत्यू , ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले

नवी दिल्लीतील (Delhi Building Collapse) मुस्तफाबाद परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळाने इमारत कोसळली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्यात १० हून अधिक लोक अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफ आणि दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. (Delhi Building Collapse)

हेही वाचा-२००० रुपयांहून अधिकच्या UPI Payment वर खरंच GST लागणार का ? केंद्र सरकारनं स्पष्टीकरण देत सांगितलं की…

विभागीय अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल यांनी सांगितले की, पहाटे २:५० वाजता घर कोसळल्याची माहिती मिळाली. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्हाला आढळले की संपूर्ण इमारत कोसळली होती आणि लोक ढिगाऱ्यात अडकले होते. पोलिसांच्या सहकार्याने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ८ ते १० जणांना वाचवण्यात आले आहे. (Delhi Building Collapse)

इमारत कोसळल्याची माहिती मिळताच श्वान पथक, पोलीस आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाली. तसेच एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन सेवा लोकांना ढिगाऱ्या खालून वाचवण्यासाठी काम करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली असलेल्या ४ जणांचा मृत्यू झाला. बचाव कार्य अजूनही सुरू आहे. घटनेच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, इमारत कोसळली त्या ठिकाणी दोन पुरुष आणि महिला राहतात. मोठ्या महिलेला तीन मुले आहेत, दुसऱ्या महिलेलाही तीन मुले आहेत. आम्हाला सध्या काहीही माहिती नाही. ते कुठेही दिसत नाहीत. (Delhi Building Collapse)

हेही वाचा-प्लास्टिक विरोधी मोहीमेत Navi Mumbai महानगरपालिका सक्रिय; 284 किलो प्लास्टिक जप्त

शुक्रवारी दिल्लीतील हवामान अचानक बदलले. रात्री मुसळधार पाऊस आणि वादळ आले. त्यामुळे शहराच्या अनेक भागांवर परिणाम झाला. त्यामुळेही इमारत कोसळल्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्लीतील मधु विहारमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत पडली होती. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले होते. (Delhi Building Collapse)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.