दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील राव आयएएस कोचिंग सेंटरच्या (Delhi Coaching Incident) तळघरात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्यानंतर मृतांचा आकडा आता तीनवर पोहोचला आहे. यूपीएससीची कोचिंग सेंटरमध्ये पावसाचे पाणी (heavy rain) शिरले. हे पाणी इतक्या प्रमाणात होते की यामध्ये विद्यार्थ्यांच्या बुडून मृत्यू (IAS Aspirant Death) झाला. हे दोन्ही विद्यार्थी आयएएसची तयारी करणारे होते.
(हेही वाचा –C P Radhakrishnan महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल; अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या)
मिळालेल्या माहितीनुसार, कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्यानं तीन विद्यार्थी अडकल्याची माहिती दिल्ली अग्निशमन विभागाला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, आम्हाला संध्याकाळी 7.15 वाजता घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. आम्ही पंप लावून पाणी बाहेर काढलं. सुरुवातीला आम्ही दोन विद्यार्थिनींचे मृतदेह बाहेर काढले. एकूण तीन विद्यार्थीनी पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली होती. सुरुवातीला त्यापैकी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यानंतर तिसऱ्या विद्यार्थींनीचा शोध घेण्यात आला. घटनेच्या वेळी तळघरात 30 विद्यार्थी होते, त्यापैकी तीन विद्यार्थी पाण्यात अडकले होते. (Delhi Coaching Incident)
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्यानं सांगितलं की, लायब्ररी 7 वाजण्याच्या सुमारास बंद होते. त्यानंतर सुमारे केवळ 35 मुलं उपस्थित होती. आम्हाला बाहेर पडण्यास सांगण्यात आलं. दरम्यान, सर्व विद्यार्थी तळघरातून बाहेर पडत होते. मात्र पाणी इतक्या वेगानं बेसमेंटमध्ये भरलं की, सर्व विद्यार्थ्यांना झटपट बाहेर पडता आलं नाही. काही विद्यार्थी अडकले आणि दोन ते तीन मिनिटांत संपूर्ण तळघर पाण्यानं भरलं. पावसाचं पाणी इतकं घाण होतं की, खाली काहीच दिसत नव्हतं. (Delhi Coaching Incident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community