दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप निश्चित (sexual harassment) करण्याचे आदेश दिले आहेत. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर सहा महिला कुस्तीपटूंनी छळ केल्याचा आरोप केला होता. तसेच ब्रिजभूषण शरण सिंह यांचे सचिव विनोद तोमर (Vinod Tomar) यांच्याविरोधात सुद्धा आरोप निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Brijbhushan Sharan Singh)
(हेही वाचा – तो प्रत्येक पालकमंत्र्यांचा अधिकारच, Aditya Thackeray यांनी दिली कबुली)
महिला कुस्तीपटूंच्या (Women wrestlers) आरोपांची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली त्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. २६ एप्रिल रोजी न्यायालयाने दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्राच्या आधारे आरोप निश्चित करण्याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. यानंतर ७ मे रोजी आरोप निश्चितीबाबत निर्णय होणार होता, मात्र अंतिम निर्णय बाकी असल्याने निकाल देता आला नाही.
कोर्टाने आपल्या निर्णयात काय म्हटले ?
अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी प्रियंका राजपूत (Priyanka Rajput) यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, ‘न्यायालयाला बृजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे आणि रेकॉर्ड सापडले आहेत. अशा परिस्थितीत न्यायालय त्यांना भारतीय दंड संहिता (IPC) कलम३५४, ३५४अ अंतर्गत दोषी ठरवते. याशिवाय कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, ‘कोर्टाला ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेशी सामग्री रेकॉर्डवर सापडली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ भाग १ अन्वये गुन्ह्यासाठी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर पीडित क्रमांक एक आणि पाच यांनी केलेले आरोप निश्चित झाले आहे. तर विनोद तोमर यांच्यावर कलम ५०६(१) अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच २६ एप्रिल रोजी या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडून दाखल केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला होता. (Brijbhushan Sharan Singh)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community