दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीच्या निर्घृण हत्येप्रकरणाचा निकाल दिल्ली न्यायालयाने राखून ठेवला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.
आफताबने गुन्हा मान्य केला
धर्मांध मुसलमान युवक आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीसोबत प्रेमाचे संबंध ठेवले होते, त्यानंतर तिचा खून करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते दिल्लीत जंगलात फेकून दिले होते. या घटनेने खळबळ माजली होती. या प्रकरणी पोलिसांनी आफताबला अटक केली. त्यानंतर आफताबने त्याचा गुन्हा पोलिसांसमोर मान्य केला. त्यानंतर त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. यानुसार दिल्ली न्यायालयात यांची सुनावणी संपली, न्यायालयाने या प्रकरणाचा अंतिम निकाल राखून ठेवला आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २९ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.
(हेही वाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर; राजकीय परिस्थितीचा घेणार आढावा)
Join Our WhatsApp Community