दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतात भूकंपाचे धक्के (Delhi Earthquake) जाणवले आहेत. रात्री १२ वाजेच्या सुमारास या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरमधील या वर्षातील हा दुसरा भूकंप आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) च्या मते, भूकंपाचा केंद्रबिंदू (Delhi Earthquake) दक्षिण चीनच्या शिनजियांग प्रांतात होता. या भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल इतकी होती. चीनमध्ये रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या ८० किलोमीटर खोलीवर होता.
(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी साजरा केला दीपोत्सव)
दिल्लीच्या इतर भागातही भूकंपाचे धक्के –
दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी (२२ जानेवारी) रात्री उशिरा भूकंपाचे धक्के (Delhi Earthquake) जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले. उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
(हेही वाचा – MLA Disqualification : सर्वोच्च न्यायालयाची शिवसेना आमदारांना नोटीस)
एका महिन्यात दुसरा भूकंप –
दिल्ली-एनसीआरमधील (Delhi Earthquake) या वर्षातील हा दुसरा भूकंप आहे. यापूर्वी ११ जानेवारी रोजी दिल्ली-एनसीआर भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे होता. भूकंपाचा धक्का जमिनीच्या पृष्ठभागापासून २२० किमी खोलीवर बसला. (Delhi Earthquake)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community