निवृत्तीनंतरही कामाचा धडाका ठेवणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश Dheerubhai Patel

173

भारत देश हा न्यायप्रिय देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातले अनेक न्यायमूर्ती देखील प्रसिद्ध आहेत. न्यायदानाचं काम खूपच कठीण असतं. दोन्ही बाजू समजून घेऊन अचूक न्याय करण्यासाठी विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता लागते. त्यापैकी एक विद्वान आणि सुप्रसिद्ध न्यायाधीश म्हणजे धीरुभाई नरेनभाई पटेल (Dheerubhai Patel)…

न्यायमूर्ती धीरुभाई नरेनभाई पटेल (Dheerubhai Patel) यांचा जन्म १३ मार्च १९६० रोजी गुजरातमध्ये झाला. पटेल यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर एम.एससी. आणि एल.एल.एम. ही पदवी प्राप्त केली आहे. २७ जुलै १९८४ रोजी त्यांनी वकील म्हणून नावनोंदणी केली आणि अहमदाबाद येथील गुजरात उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करु लागले. ते वकील म्हणून खूप यशस्वी झाले. गुजरातमध्येही नव्हे तर सबंध भारतात त्यांचा बोलबाला होऊ लागला.

(हेही वाचा Shri Ram Mandir : अयोध्येत श्रीरामाचे किती वेळात मिळते दर्शन? स्वतः मंदिर ट्रस्टने दिली माहिती)

मग पुढे ७ मार्च २००४ रोजी त्यांची गुजरात उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त झाली. पुढे तर त्यांच्या कारकिर्दीला बहर आली. २५ जानेवारी २००६ रोजी स्थायी न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ३ फेब्रुवारी २००९ रोजी झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी बदली करण्यात आली.

२४ मे २०१९ रोजी झारखंड उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून ते नियुक्त झाले. त्यांना ७ जून २०१९ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (Dheerubhai Patel) म्हणून पदोन्नती मिळाली. दीर्घकाळ सेवा दिल्यानंतर १२ मार्च २०२२ रोजी ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही त्यांची घोडदौड सुरुच आहे. १४ मार्च २०२२ ला त्यांना दूरसंचार विवाद निपटारा आणि अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.