Delhi High Court : आता फक्त निकाल नाही, न्यायालयातील गमती-जमतीही आपल्याला वाचायला मिळणार

101
Delhi High Court : आता फक्त निकाल नाही, न्यायालयातील गमती-जमतीही आपल्याला वाचायला मिळणार
Delhi High Court : आता फक्त निकाल नाही, न्यायालयातील गमती-जमतीही आपल्याला वाचायला मिळणार

न्यायालयातून निकाल आणि सुनावण्या नेहमीच ऐकायला मिळतात. आरोप-प्रत्यारोपांच्या या गंभीर वातावरणात घडलेले विनोदही आता आपल्याला कळणार आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे. लवकरच दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) संकेतस्थळावर आता न्यायालयीन कामकाजादरम्यान घडलेले विनोदही वाचायला मिळणार आहेत.

(हेही वाचा – हिंदु राष्ट्र कायम ठेवायचे असेल, तर मोदींनी योगींकडे सत्ता सोपवावी; Sharad Ponkshe यांचे परखड प्रतिपादन)

न्यायदान कक्षातील अनपेक्षित विनोदी क्षणांच्या कथा असणारे एक नवे पृष्ठ दिल्ली उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर लवकरच जोडण्यात येणार आहे. या पृष्ठावर कोर्टरूममधील विनोदी घटना, संवाद पोस्ट केले जाणार आहेत. कोर्टरूम हे विनोदाचे सुपीक स्रोत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यासाठी विशेष ई मेल आयडी तयार करण्यात आला आहे. अधिवक्ते, याचिकाकर्ते, साक्षीदार न्यायदान कक्षात घडलेल्या मजेदार घटना आणि विनोद यांची देवाण-घेवाण या मेल आयडीवर पाठवू शकतात. ई- मेल आयडीवर मिळालेल्या पोस्ट नियुक्त समितीद्वारे तपासल्यानंतर संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

वेबसाइटवरील विभाग अद्याप पूर्णपणे कार्यान्वित व्हायचा आहे, तथापि त्यात आतापर्यंत पाच विनोद प्रसिद्ध केले आहेत. यापैकी एक स्वतः न्यायमूर्तींनीच लिहिला आहे.

न्यायमूर्तींनी लिहिलेला विनोद

या विनोदात अधिवक्ते आणि न्यायमूर्ती यांच्यातील संवाद लिहिला आहे.

वरिष्ठ वकील ‘क्ष’ : न्यायमूर्ती महोदयांनी कृपा करून आता पेपर बूकच्या पान ६ वर यावे आणि डाव्या स्तंभावरील तारा (स्टार) पाहावा.

न्यायमूर्ती – मिस्टर क्ष, मला तारे फक्त संध्याकाळी ७ नंतर आकाशात दिसतात. तुम्ही ज्याचा संदर्भ देत आहात तो ‘ताऱ्याचे चिन्ह’ आहे. (६ सप्टेंबर रोजी न्या. राजीव शकधर यांनी शेअर केलेली पोस्ट.)

नियमित ताण-तणावाच्या कामकाजातही कधी वकील किंवा न्यायाधिशाच्या बुद्धीमुळे तर कधी वादी, प्रतिवादी किंवा साक्षीदाराच्या टिप्पणीमुळे विनोद घडतात. ‘ह्युमर इन कोर्ट’ हा दिल्ली कोर्टाच्या माहिती तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस कमिटीचा प्रकल्प आहे. गंभीर सुनावणीतील विनोदी क्षणांचे भावी पिढीसाठी जतन करण्याचा उद्देश यामागे आहे. (Delhi High Court)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.