मद्य घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स बजावले आहे. (Delhi liquor scam) केजरीवाल यांना 18 जानेवारी रोजी चौकशीस हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी केजरीवाल यांना 2 नोव्हेंबर, 31 डिसेंबर आणि 3 जानेवारी रोजी समन्स बजावण्यात आले होते. हे समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगत केजरीवालांनी (Arvind Kejriwal) चौकशीकडे पाठ फिरवली होती.
(हेही वाचा – IndiGo Flight Emergency Landing : गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाचे ढाका येथे लँडिंग; कारण वाचा सविस्तर)
ईडीला अरविंद केजरीवाल यांना अटक करायची आहे – आपचा आरोप
ईडीने (ED) सातत्याने समन्स जारी केल्यानंतर, आम आदमी पार्टीचा दावा आहे की, अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी ही सर्व प्रक्रिया केली जात आहे. ईडी त्यांना चौकशीच्या बहाण्याने बोलावून अटक करू इच्छित आहे. आपचे म्हणणे आहे की, जर ईडीला चौकशी करायची असेल, तर ते आपले प्रश्न लिहून केजरीवाल यांना देऊ शकतात.
आपने पूर्वीच व्यक्त केली होती शक्यता
काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) नेत्यांनी केजरीवाल यांच्या अटकेची भीती व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. ईडी आज अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापा टाकून त्यांना अटक करू शकते, असा दावा आप नेत्यांनी केला होता. दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दावा केला होता की, ईडी आज केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकू शकते, त्यानंतर त्यांना अटक केली जाऊ शकते.
(हेही वाचा – Sadhus Assault : पश्चिम बंगालमध्ये ३ साधुंना बेदम मारहाण, १२ जणांना अटक)
भाजपचे आरोप
भाजपनेही (BJP) या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते हरिश खुराणा यांनी म्हटले आहे की, आतिशी किंवा इतर आप नेत्यांना आकर्षक कथा रचण्यात मजा येते. विपश्यना तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कायदा नाही. खासदार निवडणुका महत्त्वाच्या आहेत, कायदा नाही. अरविंद केजरीवाल स्वतःला कायद्यापेक्षा वरचे समजतात, असा आरोपही त्यांनी केला होता. (Delhi liquor scam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community