मानवी तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या Kamran Haider ला अटक; दिल्लीतील तरुणीच्या फसवणूकीनंतर प्रकरण उघडकीस

137
मानवी तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या Kamran Haider ला अटक; दिल्लीतील तरुणीच्या फसवणूकीनंतर प्रकरण उघडकीस
मानवी तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या Kamran Haider ला अटक; दिल्लीतील तरुणीच्या फसवणूकीनंतर प्रकरण उघडकीस

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दि. ७ डिसेंबर रोजी मानवी तस्करीसंदर्भातील प्रकरणात आरोपी कामरान हैदरला (Kamran Haider ) अटक केली आहे. कामरान हैदर एनआयएचा फरार आरोपी आहे. त्याला २५०० किलोमीटर पाठलाग करत हैदराबादमध्ये (Hyderabad) पकडण्यात आले आहे. त्याच्यावर आरोप आहे की, तो लोकांची फसवणूक करून त्यांना कॉल सेंटरमध्ये काम करण्यास पाठवत असे. तसेच पोलिसांपासून वाचण्यासाठी तो सतत आपले राहण्याचे ठिकाण बदलत होता. (Kamran Haider )

( हेही वाचा : World Chess Championship : १२ वा डाव जिंकून डिंग लिरेनची गुकेशशी बरोबरी, आता फक्त २ डाव बाकी

ऑपइंडियाने दिलेल्या माहितीनुसार, कामरान हैदर (Kamran Haider ) दिल्लीत अली इंटरनॅशनल सर्विसेस नावाची एक कन्संलटेंट फर्म चालवत होता. त्याच्यासोबत आलम, अखिल आणि अफजल हे साथीदार ही होते. हे सर्व मिळून लोकांना विदेशात नोकरी मिळवून देण्याचे बहाने करत. मात्र त्यांचे मूळ काम मानवी तस्करी करणे हे होते. ही टोळी गरजू भारतीयांना लाओस आणि थाईलंडसारख्या देशात पाठवत असे. (Kamran Haider )

दिल्लीत राहणारा नरेश लखावतही (Naresh Lakhavat) या टोळीच्या सापळ्यात अडकला. त्याला अली इंटरनॅशनलकडून लाओस आणि थाईलंडमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली. नरेश त्यांच्या सापळ्यात अडकून थाईलंडमध्ये गेला. तिथे त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. त्यानंतर त्यांना साईबर फ्रॉर्ड करणाऱ्या चिनी कंपनीमध्ये काम करण्यास भाग पाडले गेले. भारतात परतल्यावर नरेशने जून २०२४ मध्ये पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानंतर मानवी तस्करीचे हे रॅकेट एनआयएकडे सुपूर्दे करण्यात आले. एनआयएच्या (NIA) तपासात उघड झाले की, कामरानची कंपनी मानवी तस्करीची शिकार ठरलेल्या लोकांना कॉल सेंटर पाठवत त्यांची फसवणूक करते. तसेच एनआयएच्या तपासात कळले की, ही कामरान हैदरची कंपनी अपराधी नेटवर्कचे जाळे विस्तारलेल्या दक्षिण पूर्व आशियाई देशाचा भाग आहे. त्यामुळे कामरानवर एनआयएने २ लाखाचे बक्षिस जाहिर केले. दि. ७ डिसेंबर रोजी कामरान हैदरचे लोकेशन पोलिसांना हैदराबाद (Hyderabad)येथे असल्याचे कळले. तेव्हा सापळा रचत पोलिसांनी कामरान हैदरच्या (Kamran Haider ) मुसक्या आवळल्या.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.