पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठ्या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. यामुळे दिल्लीपासून जयपूरपर्यंतचा प्रवास हा अवघ्या ३ तासांमध्ये पूर्ण होईल. सध्या या प्रवासासाठी ५ तास लागतात. या महामार्गामुळे मुंबई ते दिल्ली अंतर अवघ्या १२ तासात पार करणं शक्य होणार असून देशातील पाच राज्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. रविवारी दिल्ली ते मुंबई महामार्गाचे राजस्थानच्या दौसापर्यंतच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.
( हेही वाचा : फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालकपदी बढती)
पहिल्या टप्प्याचे लोकार्पण
दिल्ली ते मुंबई या संपूर्ण महामार्गाची लांबी १३८५ किमी असून, द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याची लांबी ही २४७ किमी आहे. हा संपूर्ण प्रकल्प ५ हजार ९४० कोटींचा आहे. पहिल्या टप्प्यासाठी जवळपास १२ हजार १५० कोटी खर्च करण्यात आला आहे. हा भाग सुरु झाल्याने दिल्ली ते जयपूर हा प्रवासाचा वेळ ५ तासांवरून साडेतीन तासांवर येणार आहे. उद्घाटनानंतर रविवारीच हा एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
पहिला ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस – वे
दिल्ली ते मुंबई या एक्स्प्रेस वेलाही ग्रीन फिल्डची अनुभूती मिळेल. प्रदूषण कमी करण्यासाठी या महामार्गावर १० लाखांहून अधिक रोपे लावण्यात येणार आहेत. दोन्ही रस्त्यांमध्ये सुमारे १० ते १५ फूट जागा ठेवण्यात आली आहे. कडुनिंब, साप, एरिका, जरबेरा आणि झायलीनची रोपे येथे लावली जात आहेत.
Join Our WhatsApp Community