दिल्लीतील (Delhi) सीमापुरी (Seemapuri) येथे राहणाऱ्या कोमल नावाच्या तरुणीची टॅक्सी चालक आसिफने हत्या केली. दि. १२ मार्च रोजी आसिफ कोमलला त्याच्या गाडीत घेऊन गेला होता. यानंतर आसिफने कोमलचा (Komal) गळा दाबून हत्या केली. यानंतर आसिफने कोमलच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.
( हेही वाचा : BCCI Code of Conduct : खेळाडूंच्या विरोधानंतरही बीसीसीआय परदेश दौऱ्यातील आचारसंहितेवर ठाम)
आसिफने (Asif) कोमलचा मृतदेह छावला कालव्यात फेकून दिला. मृतदेह पाण्यातून वर येऊ नये आणि कोणालाही कळू नये, यासाठी आरोपी आसिफने कोमलच्या (Komal) शरीराला दगड बांधला होता. परंतु दि. १७ मार्च रोजी कोमलचा (Komal) मृतदेह फुगून पाण्यावर आला. ही माहिती स्थानिकांना मिळाल्यावर त्यांनी लगेचच जवळील पोलिसांना कळवले. (Delhi)
पोलिसांनी तपास केल्यानंतर असे आढळून आले की, ज्या रात्री कोमलची हत्या झाली त्या रात्री आसिफ (Asif) तिच्यासोबत होता. यानंतर पोलिसांनी आसिफला अटक केली आहे. त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर देखील नोंदवला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, टॅक्सी चालक (Taxi driver) आसिफ कोमलला अनेक दिवसांपासून ओळखत होता. दि. १२ मार्चला कोमला घेऊन आसिफ कुठे तरी निघाला होता. त्यावेळी दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला. त्यानंतर त्याने गळा दाबून कोमलची हत्या केली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community