राजधानी दिल्ली-एनसीआरच्या हवेतील प्रदूषणाच्या पातळीमध्ये थोडी सुधारणा झाली आहे. कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CQAM) ने शनिवारी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) Grap-4 चे निर्बंध हटवले आहेत. मात्र, सध्या GRAP-3 अंतर्गत सर्व निर्बंध कायम राहतील. BS-3 आणि 4 इंजिन असलेल्या वाहनांना अजूनही सूट देण्यात आलेली नाही. तर दिल्लीत सोमवारपासून म्हणजेच २० नोव्हेंबरपासून सर्व शाळा सुरू होणार आहेत. (Delhi Air Pollution)
दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सोमवार, २० नोव्हेंबरपासून दिल्लीतील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये प्राथमिक ते बारावी पर्यंतचे वर्ग पुन्हा सुरू होतील. मात्र, हा आदेश जारी झाल्यानंतर पुढील एक आठवडा मैदानी क्रीडा उपक्रम आणि सकाळच्या बैठका आयोजित केल्या जाणार नाहीत. मात्र दिल्ली-NCR चा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 400 च्या खाली आल्यानंतर, CQAM ग्रुप-4 चे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्याचबरोबर, GRAP-3 अंतर्गत खाजगी बांधकाम आणि BS-3/4 डिझेल वाहनांवर बंदी कायम राहील.
(हेही वाचा : Western Railway : अंधेरीचा पादचारी पूल वीस दिवस बंद)
GRAP-4 काढून टाकल्यामुळे या निर्बंधांपासून सुटका
- दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणामुळे बंद झालेल्या शाळा आणि महाविद्यालये उघडता येणार आहेत.
- बांधकाम आणि पाडण्याची कामे होऊ शकतात. महामार्ग, रस्ते, उड्डाणपूल, ओव्हरब्रिज, पाइपलाइन, वीज यासंबंधीच्या सरकारी प्रकल्पांवर काम करता येईल.
- नोंदणीकृत मध्यम आणि अवजड वाहने दिल्लीत चालवण्यास सक्षम असतील.
- अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक, एलएनजी/सीएनजी आणि इतर ट्रकसह इलेक्ट्रिक ट्रकही धावू शकतील.
दिल्लीच्या हवेतील विष आणि वाढत्या वायू प्रदूषणामुळे शिक्षण विभागाने एक आठवड्यासाठी सुटी जाहीर केली होती. त्याच वेळी, दिल्ली सरकारने 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांमध्ये 9 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत हिवाळी सुट्टी जाहीर केली होती. आता, दिल्लीचा हवेचा दर्जा निर्देशांक ‘गंभीर’ वरून ‘अत्यंत खराब’ श्रेणीत घसरल्यानंतर, सोमवार (20 नोव्हेंबर) पासून शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
(हेही वाचा :…तर आदित्य ठाकरेंनी तरुंगात जावे; Nitesh Rane यांचा हल्लाबोल)
Join Our WhatsApp Community