सात वर्षांनंतर दिल्लीतील जनतेने दिवाळीत चांगल्या हवेत श्वास घेतला. रविवारी (१२ नोव्हेंबर) दिल्लीत एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) २०२ नोंदवला गेला. यापूर्वी,२०२२ च्या दिवाळीला दिल्लीत AQI ३१२ आहे. (Air Pollution)दिल्लीत ९ आणि १० नोव्हेंबर रोजी झालेल्या पावसानंतर प्रदूषणात सुमारे ५०टक्क्यांनी घट झाली आहे.
दिल्लीतील AQI सलग दोन दिवस २५० पेक्षा कमी आहे. शनिवारी (११नोव्हेंबर) AQI २१९ होता. पावसापूर्वी ९ नोव्हेंबरला दिल्लीचा AQI ४३७ नोंदवला गेला होता. मात्र, दिवाळीनंतर दिल्लीची हवा पुन्हा खराब होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने याबाबत ११ नोव्हेंबर रोजी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. दिल्ली सरकारने दिवाळी, विश्वचषक सामने आणि छठ पूजा दरम्यान फटाक्यांवर बंदी घातली आहे. आरोग्य विभागाने लोकांना सकाळ-संध्याकाळ फिरणे, फेऱ्या मारणे किंवा कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिला आहे. (Air Pollution)
दिल्लीत ‘लाइट दिवे, नो फटाके’ मोहिमेची घोषणा
दिवाळीनंतर प्रदूषणात वाढ होण्याच्या भीतीने दिल्ली सरकारने १० नोव्हेंबर रोजी ‘दिवे लावा, फटाके नाही’ मोहिमेची घोषणा केली. पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, फटाक्यांमुळे प्रदूषणात लक्षणीय वाढ होते. त्यामुळेच सरकारने फटाक्यांची निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, दिवे लावून सण साजरा करा पण फटाके फोडू नका.
(हेही वाचा : Crime : काळबादेवी येथे बंदुकीचा धाक दाखवून सोने लुटले, दोघेजण फरार)
प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने उचलली ही पावले
- दिल्लीबाहेर नोंदणीकृत ओला-उबेरसह इतर अॅप-आधारित टॅक्सींच्या प्रवेशावर बंदी आहे. राज्यात फक्त दिल्ली नोंदणीकृत अॅप आधारित टॅक्सींना चालवण्याची परवानगी आहे.
- दिल्लीत बांधकामांवर बंदी आहे. रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल, ओव्हर ब्रिज, वीज पारेषण, पाइपलाइन यासह सर्व प्रकारच्या विकासकामांवरही बंदी आहे.
- अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे डिझेल ट्रक आणि एलएनजी, सीएनजी, इलेक्ट्रिक ट्रक वगळता सर्व ट्रकचा प्रवेश बंद आहे. बीएस-३ श्रेणीतील पेट्रोल आणि बीएस-४ श्रेणीतील डिझेल वाहनांवरही बंदी घालण्यात आली आहे.
- दिल्लीत फटाक्यांवर बंदी आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिल्ली पोलिसांना दिवाळीनंतर, विश्वचषक सामन्यादरम्यान आणि छठच्या वेळी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- दिल्लीतील प्रदूषणामुळे९ ते १८ नोव्हेंबरपर्यंत शाळांना हिवाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. सर्व मंत्री दिल्लीतील विविध जिल्ह्यांवर लक्ष ठेवतील.
- केजरीवाल सरकार कृत्रिम पावसाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे दिल्ली सरकारने सांगितले. दिल्ली सरकारच्या निर्णयाला केंद्राने पाठिंबा दिल्यास २० नोव्हेंबरपर्यंत पहिला कृत्रिम पाऊस पाडता येईल.
हेही पहा –