Delhi मध्ये अटक झालेल्या बांगलादेशी घुसखोरांनी चौकशीत दिली धक्कादायक माहिती; म्हणाले, भारतीय महिलांशी लग्न करून..

133
Delhi मध्ये अटक झालेल्या बांगलादेशी घुसखोरांनी चौकशीत दिली धक्कादायक माहिती; म्हणाले, भारतीय महिलांशी लग्न करून..
Delhi मध्ये अटक झालेल्या बांगलादेशी घुसखोरांनी चौकशीत दिली धक्कादायक माहिती; म्हणाले, भारतीय महिलांशी लग्न करून..

बांगलादेशी घुसखोरांची (Bangladeshi infiltrators) मुले भारतात ईडब्ल्यूएस कोट्याचा फायदा घेत आहेत. बांगलादेशातील घुसखोर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना एक-एक करून येथे बोलावतात. काही बांगलादेशींनी तर भारतीय महिलांशी लग्नही केले आहे. हे सर्व खुलासे दिल्लीतून नुकतेच पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांनी (Bangladeshi infiltrators) केले आहेत.

( हेही वाचा : Waqf Act आणि Places of Worship Act यांमुळे हिंदूंना न्याय मिळण्यात मोठी अडचण; सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची खंत

दिल्ली (Delhi) पोलिसांनी १८ बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi infiltrators) अटक केली आहे. या बांगलादेशी घुसखोरांना भारतात स्थायिक होण्यास मदत करणाऱ्या आठ भारतीयांनाही अटक करण्यात आली आहे. हे भारतीय आरोपी बांगलादेशी घुसखोरांना इथली कागदपत्रे मिळवण्यापासून त्यांना नोकरी मिळवून देण्यापर्यंत सर्व काही करत असे. आता दिल्ली आणि आसाममधून (Assam) घुसखोरांना हाकलून लावण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

मुस्लिमांची टोळी करायची कागदपत्रे आणि नोकऱ्या मिळवून देण्यास मदत

हे बांगलादेशी बनावट कागदपत्रांच्या मदतीने भारतात राहत होते. त्यांना भारतात स्थायिक होण्यास काही भारतीय लोक मदत करत होते. या टोळीचा म्होरक्या मोहम्मद मोइनुद्दीन आहे. दिल्लीतील अमीर खुसरो नगरमध्ये त्याचे संगणकाचे दुकान होते. जिथून बांगलादेशी घुसखोरांसाठी बनावट जन्म प्रमाणपत्रे बनवण्याचे काम चालत असे.

दिल्ली (Delhi) पोलिसांचे डीसीपी अंकित चौहान (Ankit Chauhan) म्हणाले की, या रॅकेटमध्ये दिल्लीतील (Delhi) पुल प्रल्हादपूर येथील झुल्फिकार अन्सारी, फरमान खान आणि उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील जावेद यांना अटक करण्यात आली आहे. झुल्फिकार, फरमान आणि जावेद बनावट आधार कार्ड बनवायचे. हे आधार कार्ड बनवण्यासाठी ते मोइनुद्दीनने बनवलेल्या बनावट जन्म प्रमाणपत्राचा वापर करायचे. या बांगलादेशी घुसखोरांना बनावट कागदपत्रे बनवून देण्यासोबतच, या टोळीने बांगलादेशींना नोकऱ्या मिळवून देण्यातही मदत केली. मोहम्मद शाहीन (Mohammad Shaheen)

बांगलादेशी घुसखोरांना लहान-मोठ्या नोकऱ्या देत असे. या संपूर्ण सिंडिकेटसाठी पैशाचे व्यवहार निजामुद्दीनमध्ये राहणारा भारतीय तरुण मनवर हुसेन करत होता. मनवर हुसेन हा कचरा वेचणारे, भंगार विक्रेते, कामगार इत्यादी बेकायदेशीर बांगलादेशींकडून (Bangladeshi infiltrators) पैसे गोळा करायचा आणि ते फॉरेक्स एजंटना पाठवायचा जे नंतर बांगलादेशला पाठवले जायचे. डीसीपी चौहान म्हणाले की, मनवरने यूपीआयद्वारे पाठवलेले पैसे बांगलादेशातील बसीरहाट येथील फॉरेक्स एजंट निमाई कर्माकर आणि गौरांग दत्ता यांना पाठवले होते.

दोघेही हवालासारख्या इतर मार्गांनी घुसखोरांच्या नातेवाईकांना संपूर्ण जमा झालेली रक्कम पाठवत असत. दिल्ली पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांकडून २३ मतदार कार्ड, १९ पॅन कार्ड, १७ आधार कार्ड, ११ जन्म प्रमाणपत्रे आणि सहा साधे मतदार कार्ड जप्त केले आहेत.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अनेक घुसखोरांनी (Bangladeshi infiltrators) येथे भारतीय महिलांशी लग्न केले आहे आणि त्यांची मुले देखील स्थानिक शाळांमध्ये शिक्षण घेतात. घुसखोरांची मुलेही ईडब्ल्यूएस कोट्याचा फायदा घेत आहेत. एका बांगलादेशी घुसखोराने एअरलाइनमध्ये नोकरीही स्वीकारली. दिल्लीत पकडलेले बांगलादेशी घुसखोर एक एक करून भारतात येत राहिले. पोलिसांनी सांगितले आहे की, मोहम्मद आलमगीर (Mohammad Alamgir) २००७ मध्ये बांगलादेशहून भारतात आला होता. येथे त्याने एका भारतीय महिलेशी लग्न केले. त्याला १३ आणि ९ वर्षांची दोन मुले आहेत.

२०२१ मध्ये त्याचा भाऊ मोहम्मद जुवैल भारतात आला. याशिवाय २०१५ मध्ये मोहम्मद लतीफ खान (Mohammad Latif Khan) , २०२१ मध्ये नदीम शेख, २०२२ मध्ये मिजानुर रहमान आणि रबिउल आणि २०१४ मध्ये कमरुज्ज्मान भारतात आले. या सर्वांमध्ये, सर्वात जास्त काळ भारतात राहिलेली व्यक्ती म्हणजे २००० मध्ये आलेला मोहम्मद रेजाउल. गेल्या दोन वर्षांत त्यांनी २२ वेळा बांगलादेशला भेट दिली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे की त्यांनी यापूर्वी अटक केलेल्या ६ बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशात परत पाठवले आहे. याशिवाय आणखी ४ बांगलादेशी घुसखोरांची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही बांगलादेशला परत पाठवले जाईल.

आसाममधूनही १३ जणांना केले हद्दपार

दिल्ली व्यतिरिक्त, आसाममध्येही बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi infiltrators) वेगाने अटक केली जात आहे. दि. २१ मार्चला आसाम सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, आसाममधील मटिया ट्रान्झिट कॅम्पमध्ये ताब्यात घेतलेल्या ६३ बांगलादेशी घुसखोरांपैकी १३ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरित ५० बांगलादेशी घुसखोरांची कागदपत्रे तपासली जात आहेत. यापूर्वी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आसाम सरकारला संक्रमण शिबिरात ठेवलेल्या ६३ लोकांवर कारवाई न केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.