देशातील दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! मुंबई कनेक्शन उघड

अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांपैकी जान महंमद शेख नावाचा अतिरेकी मुंबईतील सायन येथे राहणारा आहे.

नवी दिल्लीत पोलिसांच्या स्पेशल सेल आणि उत्तर प्रदेशच्या एटीएसने ६ दहशतवाद्यांना अटक केली. या सहा  अतिरेक्यांपैकी दोन जणांना पाकिस्तानामध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या सर्व अतिरेक्यांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने मदत केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिस आयुक्त नीरज ठाकूर यांनी ही माहिती दिली.

या कारवाईत पहिली अटक महाराष्ट्रात करण्यात आली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून २ जणांना दिल्ली आणि त्यानंतर उर्वरीत तिघांना उत्तर प्रदेश एटीएससोबत कारवाई करून अटक करण्यात आली. त्यातील दोघे जण हे मस्कतला गेले होते. तेथून ते पाकिस्तानात गेलेले. त्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे प्रशिक्षण घेतले होते. आणि स्लीपर सेलप्रमाणे काम करत होते. त्यांना हवाला रॅकेटच्या माध्यमातून फंडिंग केले जात होते. देशभरात सण आणि उत्सवाचे वातावरणाचा हे अतिरेकी फायदा घेणार होते.
– नीरज ठाकूर, दिल्ली पोलिस आयुक्त

(हेही वाचा : वीर सावरकर आमच्यासाठी दैवत, त्यांचा अवमान सहन करणार नाही!)

मुंबईशी संबंध 

सूत्रांच्या माहितीनुसार, जान महंमद शेख नावाचा अतिरेकी मुंबईतील सायन येथे राहणारा आहे. त्याला पहिली अटक झाली. त्याचा संबंध अनिस इब्राहिम याच्याशी थेट संबंध आहे. उर्वरित अतिरेक्यांची नावे महंमद ओसामा, जीशान कमर, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद अमीर जावेद आणि मूलचंद लाला अशी अतिरेक्यांची नावे आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here