राजधानी दिल्लीतील रेल्वे स्थानकावर शनिवारी, १५ फेब्रुवारीला रात्री ९:२६ वाजताच्या सुमारास मोठी चेंगराचेंगरी (Delhi Stampede) झाली. या चेंगराचेंगरीत १८ जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये १४ महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. यामागे जिहादी मुसलमानांचे षडयंत्र होते असा संशय आहे, कारण या ठिकाणी काही मुसल्मान तरुण रांगेत न जाता धक्काबुक्की करत जात होते, तसेच अल्लाह हू अकबर च्य घोषणा देत होते. या लोकांनी जाणीवपूर्वक अफवा पसरवून गर्दीला दिशाभूल केल्याचे प्रत्यक्षदर्शीने म्हणणे आहे.
“Some people started shouting Allahu Akbar on platform & pushing all of us. My friend Ayush died & my hand is badly bruised”
Horrific facts by eye witness Shivam Shukla 😥#Delhi #trainaccident pic.twitter.com/mTy5YCqDDi
— Kreately.in (@KreatelyMedia) February 16, 2025
शुभम शुक्ला या प्रत्यक्षदर्शी मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो मुलगा म्हणत आहे की, काही लोकांनी नवी दिल्ली स्टेशनवर जाणूनबुजून चेंगराचेंगरी (Delhi Stampede) घडवून आणली. काही लोक अचानक स्टेशनवर उपस्थित असलेल्या गर्दीत घुसतात आणि अल्लाह-हू-अकबरचे नारे देऊ लागतात. तसेच स्वतंत्र सेनानी एक्स्प्रेस फलाट क्रमांक १३ वर उभी होती, मी स्वतः तिकडे होतो, तरीही षडयंत्री लोकांनी गाडी दुसऱ्या फलाटावर येत आहे, अशी अफवा पसरवली वस्तुतः मी स्वतः तिक्डे होतो, मी गाडी दुसऱ्या फलाटावर येत असल्याची उद्घोषणा ऐकली नाही. ही अफवा होती, ज्यामुळे गर्दीची दिशाभूल झाली आणि गोंधळ उडाला, कुणी तरी कुंभमेळ्याची बदनामी करण्यासाठी हे घडवून आणल्याचे शुभम शुक्ला म्हणाला.
शनिवारी रात्री ९:२६ वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत (Delhi Stampede) १८ जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये १४ महिला आणि ३ मुलांचा समावेश आहे. यासोबतच २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांना दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात आणण्यात आले, जिथे डॉक्टरांनी सांगितले की सर्व लोकांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे. रेल्वे मंत्रालयाने या अपघाताची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये उत्तर रेल्वेचे दोन अधिकारी समाविष्ट आहेत. सध्या, समितीने नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांना सर्व सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे आदेश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community