Delhi Railway Station मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दिवशी किती हजार तिकिटांची विक्री झाली होती?

56
Delhi Railway Station मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दिवशी किती हजार तिकिटांची विक्री झाली होती?
Delhi Railway Station मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दिवशी किती हजार तिकिटांची विक्री झाली होती?

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर (Delhi Railway Station ) दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीसंदर्भात (Stampede) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. ही घटना रेल्वे प्लॅटफॉर्मवर अचानक मोठ्या प्रमाणात जमलेल्या गर्दीचे कारण सांगण्यात आले होते. मात्र आता रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दिवशी झालेल्या तिकीट विक्रीची (Ticket sales) माहिती समोर आली आहे.

( हेही वाचा : IPL 2025 : कोलकाताने अजिंक्य रहाणेला कर्णधार का केलं?, ऐका सीईओनं दिलेलं कारण

दिल्लीतील चेंगराचेंगरीची (Stampede) घटना घडली तेव्हा एकाचवेळी जास्तीत जास्त किती हजार तिकीटे विकले (Ticket sales) गेले होते? याची आकडेवारी केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे. चेंगराचेंगरीच्या (Stampede) दिवशी विकले गेलेले एकूण तिकिटे गेल्या सहा महिन्यांत विकल्या गेलेल्या दैनिक सरासरी तिकिटांपेक्षा १३००० पेक्षा जास्त होती, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी लोकसभेत दिली.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) म्हणाले की, चेंगराचेंगरीच्या दिवशी सुमारे ४९,००० जनरल तिकिटे विकली गेली होती. तसेच गेल्या सहा महिन्यांत सरासरी ३६,००० तिकिटे विक्री झाली होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात विकल्या जाणाऱ्या दैनिक सरासरी तिकीटांपेक्षा १३००० पेक्षा जास्त होती, अशी माहिती वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी दिली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.