Delhi : जी-२० परिषदेसाठी राजधानी सज्ज

जी-२० देशांच्या प्रमुखांसह इतरही देशांचे प्रमुख व आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी असे ४० देशांचे मान्यवरांची मांदियाळी दिल्लीत राहणार आहे.

137
Delhi : जी-२० परिषदेसाठी राजधानी सज्ज
Delhi : जी-२० परिषदेसाठी राजधानी सज्ज

काही दिवसांवर आयोजित करण्यात आलेल्या जी-२० (G-20) परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अन्य राष्ट्रप्रमुख मात्र शुक्रवारी ( ८सप्टेंबर ) राजधानी दिल्लीत (Delhi )दाखल होतील.पंतप्रधान कार्यालयाकडून सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला गेला आहे. मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे आकर्षक सजावट करण्यात आली आहे. येत्या गुरुवारी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन भारतात येण्याची शक्यता आहे. ९ आणि १० सप्टेंबरला होणाऱ्या परिषदेचे यजमानपद दोन दशकांनंतर भारताला मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेमध्ये प्रामुख्याने आर्थिक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

जी-२० देशांच्या प्रमुखांसह इतरही देशांचे प्रमुख व आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी असे ४० देशांचे मान्यवरांची मांदियाळी दिल्लीत राहणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांनी जी-२० परिषदेच्या सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.राष्ट्रप्रमुखांसोबत येणाऱ्या अधिकाऱ्यांना व्हिसाबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश पी. के. मिश्रा यांनी दिले.

१६० विमान रद्द
राष्ट्रप्रमुखांच्या आगमनामुळे येत्या ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या काळात दिल्लीत येणारी व जाणारी अशी १६० विमाने रद्द केली आहेत. ज्या प्रवाशांनी या काळातील विमानप्रवासाचे बुकिंग केले आहे. त्यांना परतावा केला जाईल, असे विमान कंपन्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा : Ambabai Temple: अंबाबाई मंदिर परिसर संगीतमय होणार, प्रशासनाकडून लवकरच ‘संगीत खांबां’ची रचना)

३९ मेट्रो स्टेशन बंद राहणार
८ ते १० सप्टेंबर काळात दिल्लीतील ३९ मेट्रो स्टेशन बंद राहणार आहेत. यात इंदिरा गांधी विमानतळाकडे जाणारे सर्व मेट्रो स्टेशन बंद राहतील. केवळ टर्मिनल ३ व टर्मिनल १ वर मेट्रोद्वारे थेट प्रवाशांना जात येईल.याशिवाय खान मार्केट, जनपथ, केंद्रीय सचिवालय, कैलाश कॉलनी, बाराखंबा रोड, आश्रम, जंगपुरा, आयआयटी, हौजखास, सर्वोच्च न्यायालय, लोककल्याण मार्ग, आयटीओ व चांदणी चौक यासारखे महत्त्वाचे मेट्रो स्टेशनही बंद राहणार आहेत.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.