Delhi मध्ये ‘महिला समृद्धी योजने’चे निकष कठोर होणार; ३ मुले असणाऱ्या महिलांना आता…

45
Delhi मध्ये 'महिला समृद्धी योजने'चे निकष कठोर होणार; ३ मुले असणाऱ्या महिलांना आता...
Delhi मध्ये 'महिला समृद्धी योजने'चे निकष कठोर होणार; ३ मुले असणाऱ्या महिलांना आता...

दिल्लीतील (Delhi) भाजपा (BJP) सरकारने महिला समृद्धी योजनेबाबत (Mahila Samridhi Yojana) कठोर नियमावली लागू केली आहे. दिल्लीमध्ये या योजनेचा लाभ कुटुंबातील सर्वात वयस्कर महिलेला मिळेल. दिल्ली सरकार (Delhi Govt) तीनपेक्षा जास्त मुले असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ देणार नाही. याअंतर्गत, तीन मुलांची आई या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.

( हेही वाचा : वांद्रे पूर्वे येथे राज्याचे नवीन ‘महापुराभिलेख भवन’ बांधणार; मंत्री Adv Ashish Shelar यांची घोषणा

दिल्ली निवडणुकीदरम्यान (Delhi Election) भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा २५०० रुपये भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. दिल्ली सरकारने ८ मार्च २०२५ रोजी महिला दिनानिमित्त ही योजना लागू करण्याची घोषणा केली. त्यासाठी दिल्लीच्या मंत्रिमंडळाने ही योजना राबविण्यासाठी ₹५१०० कोटी रुपयांच्या निधीचीही तरतुद केली. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी, हे पैसे अपात्र लोकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून अनेक महत्त्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागतील.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखादी महिला ३ पेक्षा जास्त मुलांची आई असेल तर तिला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय, जर एखाद्या महिलेच्या मुलांना लसीकरण झाले नसेल तर तिलाही या योजनेतून वगळण्यात येईल. याशिवाय, जर बीपीएल कार्डवर (BPL card) एकापेक्षा जास्त महिलांचे नाव समाविष्ट असेल, तर घरातील सर्वात वयस्कर महिलेलाच हा लाभ दिला जाईल. याशिवाय, जर महिलेला विधवा किंवा वृद्धापकाळ निवृत्तीवेतन सारख्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत असेल, तर त्या महिलेलाही लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट केले जाणार नाही. (Mahila Samridhi Yojana)

योजनेचा लाभ कोणाला मिळू शकेल

महिला समृद्धी योजना (Mahila Samridhi Yojana) केवळ गरीब आणि गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकटी देण्यासाठी आणण्यात आली आहे. याअंतर्गत, २१ ते ६० वयोगटातील बीपीएल कार्डधारक महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ₹ 1 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच बीपीएल कार्ड (BPL card) दिले जाते. या योजनेचा लाभ अशा महिलांना मिळेल ज्या किमान ५ वर्षांपासून दिल्लीत राहत आहेत आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी आहे. असा अंदाज आहे की दिल्लीत सुमारे २० ते २५ लाख बीपीएल कार्डधारक महिला आहेत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.