धक्कादायक! नाशिक जिल्ह्यात आढळले डेल्टाचे ‘इतके’ रुग्ण!

जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिक शहरात २, तर ग्रामीण भागात २८ रुग्ण हे कोरोनाच्या डेल्टा विषाणूने बाधित झाले आहेत.

77

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊन काही निर्बंध शिथिल होत असतानाच रविवार, ७ ऑगस्ट रोजी गावांतील रुग्णांमध्ये डेल्टाचे विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची विशेष खबरदारी घेतली असून हा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत.

नागरिकांनी घाबरू नये, मात्र कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, आजार अंगावर काढू नये, आजारावर तातडीने उपचार करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
– डॉ. किशोर श्रीवास

२ शहरात, २८ ग्रामीण भागात आढळले रुग्ण!

दुसऱ्या लाटेच्या तुलनेत यंदा रुग्ण संख्या कमी असली तरी जे रुग्ण सापडत आहेत, त्यांना कोणत्या विषाणूने ग्रासले आहे याबाबत शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाने १५५ रुग्णांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविले होते. त्यातील ३० नमुन्यात डेल्टा विषाणू आढळून आला असल्याचे समजते. जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिक शहरात २ तर ग्रामीण भागात २८ रुग्ण हे कोरोनाच्या डेल्टा विषाणूने बाधित झाले आहेत. यात गंगापूर रोड, सादिकनगर, (नाशिक), दोडी, ठाणगाव, मुसळगाव, मेंढी (सिन्नर), महाजनपूर (निफाड), कासारी, मांडवड (नांदगाव), कासारखेडा (येवला), कसबेसुकेणे (निफाड), वडाळीभोई, वरखेड, कुंदेलगाव, कानमंडाळे (चांदवड), कोतवाल वस्ती, शिवाजीनगर (कळवण), घोटी या भागांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाकडे याबाबतचा अहवाल येताच आपत्ती व्यवस्थापन विभागाने संबंधित तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.