महाराष्ट्र राज्य शासनाच्या खटुवा समितीच्या शिफारशीनुसार कॅब (CAB) विषयी रेट कार्ड जाहीर झालेले आहे. ७ ते ८ महिने होऊन सुद्धा या जाहीर झालेल्या दरपत्रकानुसार ओला, उबर व तत्सम एप्लीकेशन वर आधारित कंपन्यांनी दर अमलात आणले नाहीत. हे दरपत्रक पुणे जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक अॅप कंपन्यांना लागू करण्यात यावेत आणि पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सवारी कॅब, गोजो कॅब, टॅक्सी बाजार, कॅब बाजार, इन ड्राईव्ह, ब्ला ब्ला कार्स, वनवे कॅब, रॅपिडो, ई – कॅब, एव्हरेस्ट फ्लीट या बेकायदेशीर चालू असलेल्या (CAB) कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष वर्षा शिंदे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी पुणे शहर अध्यक्ष सदाशिव हुडगे, पुणे जिल्हा अध्यक्ष मंगेश काटकर, उपाध्यक्ष सचिन कापरे, सचिव बालाजी भांगे, सल्लागार अर्जुन फुंदे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष नाथाभाऊ फुंदे, सचिव दीपक गायकवाड, सल्लागार राहुल रोहमारे, प्रसिद्धी प्रमुख कृष्णा मोठे आदी उपस्थित होते. वर्षा शिंदे पाटील म्हणाल्या, पुणे जिल्ह्यामध्ये वाकड नाशिक फाटा, चांदणी चौक, पुणे स्टेशन, नवले ब्रिज अशा ठिकाणी मुंबई पुणे प्रवासासाठी अवैधरित्या प्रवासी वाहतूक बेकायदेशीरपणे चालत आहे. प्रवासी एप्लीकेशन वर आधारित कंपन्या यांच्या आधारे ही वाहतूक केली जात आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.
Join Our WhatsApp Community