Kerala Film Industry मध्ये सेक्सची मागणी सामान्य; मेकअप आर्टिस्टने सांगितली काळी बाजू

184
Kerala Film Industry मध्ये सेक्सची मागणी सामान्य; मेकअप आर्टिस्टने सांगितली काळी बाजू
Kerala Film Industry मध्ये सेक्सची मागणी सामान्य; मेकअप आर्टिस्टने सांगितली काळी बाजू

सुरुवातीला मी हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करत होते. त्या वेळी वर्ष २०१४ मध्ये एका वरिष्ठ मेक-अपमनने मला त्याच्या खोलीत बोलवलं. त्या वेळी माझा लैंगिक छळ करण्यात आला. दुसऱ्या एका प्रसंगात मी एका मेक अप आर्टिस्टला फोन कॉल केला. तो कॉल मी ठरवून रेकॉर्ड केला. त्या वेळी मी त्याला विचारले की, तू मला काम देतो आहेस, तुला या बदल्यात काय हवे आहे? त्यावर त्याने सेक्स असं उत्तर दिलं असा आरोप मनिषाने केला. यानंतर मी FEFKA म्हणजेच केरळच्या सिनेमाशी (Kerala Film Industry) संबंधित असोसिएशनशी संपर्क केला आणि लैंगिक छळाचे मुद्दे मांडले. पण माझ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यानंतर घडलं असं की, काम मिळवण्यासाठी माझा संघर्ष वाढला. सहजासहजी कुणी काम मिळू दिलं नाही, असे धक्कादायक अनुभव केरळ चित्रपटसृष्टीतील रंगभूषाकार (मेकअप आर्टिस्ट) शिवप्रिया मनिषा यांनी सांगितले.

(हेही वाचा – कोणत्या सरकारच्या काळात महिलांवर सर्वाधिक अत्याचार? National Crime Records Bureauची धक्कादायक आकडेवारी)

हेमा समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

केरळमधील मल्याळम सिनेसृष्टीत (Kerala Film Industry) महिलांना कुठल्या गोष्टींना सामोरे जावे लागते? या गोष्टी यातून बाहेर आल्या आहेत ज्या अर्थातच धक्कादायक आहेत. बलात्कार आणि शोषण या संबंधीच्या अनेक गोष्टींना हेमा समितीच्या अहवालाने वाचा फोडली आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर अभिनेता सिद्दिक्की यांनी असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट या संघटनेचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मल्याळम सिनेसृष्टीत मागच्या १५ वर्षांपासून मेक अप आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या शिवप्रिया मनिषा आणि अन्य महिलांनी हे अनुभव मांडले आहेत. इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने तिची मुलाखत घेतली आहे.

शिवप्रिया मनिषा यांनी अनेक चित्रपटांमधील कलाकारांना मेक अप केला आहे. सध्या या मेक अप आर्टिस्टने उदरनिर्वाहासाठी नववधूचा मेक अप करण्याचं काम हाती घेतलं आहे. माझ्या हातात सध्या फारसे चित्रपट नाहीत, त्यामुळे मला आता कुणी शय्यासोबत करशील का? हे विचारणार नाही असेही शिवप्रिया मनीषा यांनी सांगितले.

…की स्वप्नं मातीमोल होतात

एका महिला सहाय्यक दिग्दर्शकानेही सांगितले की, मल्याळम सिनेसृष्टीत (Kerala Film Industry) सेक्सबाबत विचारणा केली जाणं नॉर्मल आहे. जेव्हा तुम्ही सहाय्यक म्हणून काम करत असता तेव्हा तुम्ही दिग्दर्शक बनण्याचंही स्वप्न पाहता. पण सेक्सबाबत विचारणा झाली की, ही स्वप्नं मातीमोल होतात.

काम करणं खूप कठीण आणि आव्हानात्मक

आणखी एका मेक अप आर्टिस्टने सांगितलं की, “मी १९९० च्या दशकात मल्ल्याळम सिनेसृष्टीत (malayalam film industry) आले. त्या काळात वेळेचं काही भानच नसे, तसंच शिफ्टही लांबत, काम करणं खूप कठीण आणि आव्हानात्मक होतं. पुरुष सहकारी शोषण करायचे. आम्ही शुटिंगसाठी एके ठिकाणी गेलो होतो. तिथे हॉटेलवर थांबलो. मी सकाळी उठले, तेव्हा मला धक्का बसला कारण माझ्या बेडवर शेजारी एक माणूस काळी लुंगी घालून बसला होता. मी त्याला पाहून पळाले. तर मला इतरांनी सांगितलं तुला भास झाला असेल. पण मी त्या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल केली. मी ज्या काळात काम करत होते, तेव्हा तर मेक-अप आर्टिस्ट दार वाजवायचे रुममध्ये येण्याआधीच सेक्सची मागणी करायचे. माझ्याबरोबर हा प्रकार दोनदा झाला आहे. पण मी ते दार वाजवत असताना उघडलं नाही. एकदा मी पीपहोलमधून पाहिलं तर आमच्या चित्रपटाचे निर्मातेच उभे होते. हे पाहून मला धक्का बसला.”

यासंदर्भात फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ केरळ म्हणजेच FEFKA कडे (Kerala Film Industry) संपर्क साधला असता त्यांनी ‘या प्रकरणात आमच्याकडे कुठलीही तक्रार आली नाही’, असे सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.