गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाण्यातून धर्मवीर एक्स्प्रेस सोडण्याची मागणी

गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ठाण्यातून कोकण रेल्वेमार्गावर धर्मवीर एक्स्प्रेस सोडावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या आणखी १०० गाड्यांमध्ये प्रवाशांना मिळणार ‘टॅप इन टॅप आउट’ सुविधा! )

धर्मवीर एक्स्प्रेस सोडण्याची मागणी

गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील फारच मोठा सण असतो. याच काळात चाकरमानी संपूर्ण कुटुंबासह आपल्या मूळ गावी जाण्यास निघतात. कोविडकाळ संपल्यानंतर यावर्षी प्रथमच येणाऱ्या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी रवाना होणार आहेत. आतापर्यंतच्या सर्व रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या आहेत. ठाणे रेल्वे स्थानक कोकणाकडे जाणाऱ्या मार्गाचे महत्त्वाचे ठिकाण आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे हे ठाण्याचे वैभव होते. त्यांच्या नावाने ३१ ऑगस्ट २०२२ रोजी येणार असलेल्या गणेशोत्सवासाठी ठाणे स्थानकातून २९ ऑगस्ट रोजी धर्मवीर एक्स्प्रेस अनारक्षित गाडी सोडण्यात यावी, असे संघटनेने पत्रात म्हटले आहे. संघटनेचे प्रमुख राजू सुदाम कांबळे, अध्यक्ष सुजित सुरेश लोंढे आणि सचिव दर्शन कासले यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here