- सुजित महामुलकर
सुमारे ५०० वर्षानंतर आयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यात येत असून त्याचा उद्घाटन समारंभ मोठ्या जल्लोषात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यामुळे २२ जानेवारी हा दिवस तमाम हिंदु धर्मियांच्या व रामभक्तांच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण असणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा तमाम जनतेला टीव्हीवर थेट बघता यावा यासाठी राज्यामध्ये दिलेल्या सुट्यांपैकी एखादी सुट्टी रद्द करून त्याऐवजी फक्त याच वर्षाकरिता २२ जानेवारी, २०२४ रोजी राज्यामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहिर करून तमाम हिंदु रामभक्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी शुक्रवारी (१५ डिसेंबर) विधानसभेत केली. (Ayodhya Ram Mandir)
३०० रामभक्त आयोध्येला पायी चालत निघाले..
या दिवशी राममंदिरामध्ये (Ayodhya Ram Mandir) रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यातून तसेच परदेशातून रामभक्त मोठ्या संख्येने आयोध्येमध्ये उपस्थित राहणार आहेत. “माझ्या मतदारसंघातून देखील ३०० रामभक्त आयोध्येला पायी चालत जाऊन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. २२ जानेवारी, हा दिवस तमाम हिंदु धर्मियांच्या व रामभक्तांच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण असणार आहे,” असे सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलेल्या पत्रात नमूद केले. (Ayodhya Ram Mandir)
(हेही वाचा – Vijay Hazare Trophy : विजय हजारे चषकाच्या अंतिम फेरीत राजस्थान वि. हरयाणा)
विविध कार्यक्रमाचे आयोजन
हा दिवस तमाम हिंदु धर्मियांच्या व रामभक्तांच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण असणार आहे. या दिवशी देशभर दिवाळीच साजरी होणार असून यावेळी श्रीराम कथा, श्रीराम नाम संर्कीतन, दीपोत्सव, महाआरती, भगवा जल्लोष असे अनेक कार्यक्रम देशाच्या प्रत्येक गावा-गावातून साजरे होणार आहेत. हा ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मिडियाच्या माध्यमातून टि. व्हि. वर दाखविण्यात येणार आहे. राज्यातील बहुतांश वर्ग हा शासकिय, निमशासकिय व खाजगी क्षेत्रात काम करणारा वर्ग असून हा ऐतिहासिक सोहळा डोळ्यात साठवता यावा व या सोहळ्याचे भागिदार होता यावे यासाठी त्यांना सुट्टी मिळणे गरजेचे आहे, असे सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी म्हटले आहे. (Ayodhya Ram Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community