Pune-Daund Route वर लोकल सुरू करण्याची मागणी

43
Pune-Daund Route वर लोकल सुरू करण्याची मागणी

दौंड-पुणे मार्गावर (Pune-Daund Route) धावणाऱ्या डेमू जुन्या झाल्या आहेत. तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणावरून त्या वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे विभागाने दोन मेनलाइन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट मेमूची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे. मात्र, पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपने डेमू किंवा मेमूऐवजी पुणे-दौंड उपनगर घोषित करून या मार्गावर लोकल (ईएमयू) सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

(हेही वाचा – आता टप्प्याटप्प्याने देता येणार पैसे; MHADA ची चार हजार घरांची Lottery निघणार; जाणून घ्या सविस्तर माहिती  )

ही लोकल सुरू झाल्यास नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल. व्यवसाय, शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने येथून अनेक जण पुण्यात येतात. त्यामुळे पुणे-दौंड (Pune-Daund Route) दरम्यान दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दौंड, पाटस, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी, लोणी, मांजरी, हडपसर हे पुण्याचा अगदी जवळ असल्यामुळे येथे राहणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.

(हेही वाचा – सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारण्याची मंत्री Nitesh Rane यांची मागणी)

त्यामुळे हडपसर येथील आयटी पार्क, हॉस्पिटल, इंडस्ट्रिअल विभाग, मांजरी येथील सिरम कंपनी, कॉलेज, लोणी येथील एमआयटी विद्यापीठ, उरुळी येथील प्रयागधाम, यवतमधील गूळ उत्पादक कारखाने, कुरकुंभ एमआयडीसी, एसआरपीएफ कॅम्प, दौंड नगरपालिका येथे कामाला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, या मार्गावर धावणाऱ्या डेमू व्यवस्थित चालत नाहीत, तसेच तिला सतत बाजूला करून दुसऱ्या गाड्यांना पुढे सोडले जाते. (Pune-Daund Route)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.