BEST : बेस्टच्या खासगी कंत्राटी कामगारांच्या पगारात १२०० रुपयांची वाढ

बेस्टच्या खासगी कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला आले अखेर यश

368
BEST : बेस्टच्या खासगी कंत्राटी कामगारांच्या पगारात १२०० रुपयांची वाढ
BEST : बेस्टच्या खासगी कंत्राटी कामगारांच्या पगारात १२०० रुपयांची वाढ

बेस्टच्या खासगी कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून त्यांच्या बेसिक स्वरुपात १२०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.या पगारवाढीसोबतच इतरही मागण्या संबंधित बस पुरवठादार कंपनीच्या कंत्राटदाराने बेस्टचे व्यवस्थापक विजय सिंघल आणि महाराष्ट्र राज्य कामगार सेनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत या मागण्या मान्य केल्याची माहिती मिळत आहे.

पगारवाढीसह बेस्टमध्ये कायम करून घेण्याच्या व इतर मागण्यासाठी बेस्ट उपक्रमात बस पुरवठा करणाऱ्या खासगी कंत्राटदारांनी नियुक्त केलेल्या कामगारांनी मागील काही दिवसांपूर्वी कामबंद आंदोलन पुकारले होते. आझाद मैदानावर सात दिवस चाललेल्या या आंदोलनाच्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी कामगारांची अडचणी समजून घेत त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार खासगी कंत्राटी कामगारांनी आंदोलन मागे घेतले होते.

हेही वाचा -(Devendra Fadanvis’s Japan Visit : वर्सोवा-विरार सी लिंकला जपान संपूर्ण सहकार्य करणार – फडणवीस)

या आंदोलनानंतर या कंत्राटी कामगारांच्या प्रतिनिधींची बेस्ट भवनमध्ये त्यांच्या मागण्या आणि प्रश्नांबाबत महाव्यवस्थापक विजय सिंघल यांच्या दालनात बैठक पार पडली. शिवसेनेचे प्रवक्त नरेश म्हस्के, बस पुरवठादार कंपनीचे मालक प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे अध्यक्ष जेरी डेव्हिड , माजी नगरसेवक किरण लांडगे , नागेश टवटे , सुरेश तोडकर , रघुनाथ खजूरकर आदींसह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

याबैठकीत कामगारांच्या बोनस ,रजा ,मोफत पास, न्यायालयीन केसेस इत्यादी सर्व मागण्या मंजूर करून त्यांच्या महिना  बेसिक पगारात १२०० रुपयांची वाढ करण्यात आली. या सकारात्मक बैठकीनंतर सर्व कामगारांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे. हे सर्व कामगार कंत्राटी असल्याने बेस्टमध्ये कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी वगळता बहुतांशी सर्व मागण्या मान्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.