- ऋजुता लुकतुके
भारतातील भांडवली बाजारांची नियामक संस्था असलेल्या सेबीने गुंतवणूक सल्लागारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. आणि त्यानुसार सल्लागारांनी दर सहा महिन्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलची माहिती सेबीला कळवायची आहे. त्यासाठी सेबीने एक फॉर्मही जारी केला आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि लिंक्ड-इन बरोबरच इतर सोशल मीडियावर शेअर केलेली माहितीही सेबीला सादर करणं गरजेचं आहे. (Demat Accounts SEBI Crackdown)
सोशल मीडिया हँडलबरोबरच या फॉर्ममध्ये इतरही गोष्टी आहेत. तुमचा सेबी नोंदणी क्रमांक आणि सल्लागारांविरोधात दाखल झालेल्या तक्रारी यांची नोंदही स्वत: सल्लागारांनी या फॉर्ममध्ये करायची आहे. त्यानंतर येतो तो सोशल मीडिया हँडलचा रकाना. यामध्ये तुमच्या हँडलचं नाव ठळकपणे नमूद करायचं आहे. त्यावर लक्ष ठेवण्याचं काम सेबीसाठी इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स ॲडमिनिस्ट्रेशन अँड सुपरव्हायझरी बॉडी (IAAAB) ही संस्था करणार आहे. आताही ही संस्था सल्लागारांच्या सोशल मीडिया खात्यांवर लक्ष ठेवून असते. आणि तो अहवाल सेबीला सादरही करते. (Demat Accounts SEBI Crackdown)
(हेही वाचा – Sam Pitroda : पित्रोदाच नव्हे संपूर्ण कॉंग्रेस वर्णद्वेषी; भाजपा प्रवक्ते शहजाद पुनावाला यांचा घणाघात)
गुंतवणुकदारांच्या सुरक्षिततेसाठी सेबीने उचलले हे पाऊल
आता सेबीने जारी केलेला हा नवीन फॉर्म दर सहा महिन्यांनी भरायला आहे. आणि यासाठी आर्थिक वर्ष गृहित धरण्यात आलं आहे. त्यामुळे सहामाही संपल्यानंतर सात दिवसांच्या आत नवीन फॉर्म भरला गेला पाहिजे आणि त्यात सर्व रकाने भरलेले असणंही अनिवार्य आहे. अर्धवट भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही, असं सेबीने मार्गदर्शक तत्त्व जारी करताना म्हटलं आहे. सेबीच्या वेबसाईटवर हे पत्रक आणि फॉर्मही उपलब्ध आहे. (Demat Accounts SEBI Crackdown)
गुंतवणुकदारांच्या सुरक्षिततेसाठी सेबीने हे पाऊल उचललं आहे. कारण, ग्राहकांना सोशल मीडियावर चुकीचा सल्ला देऊन त्यांची दिशाभूल केल्याच्या तक्रारी सेबीकडे नियमितपणे येत असतात. अशा सल्लागारांविरुद्ध पाश आवळण्याचे सेबीचे प्रयत्न आहेत. (Demat Accounts SEBI Crackdown)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community